Lokmat Sakhi >Social Viral > Mothers Day 2022 : आईला काय देणार खास गिफ्ट? यादगार- पर्सनल टच देणारे ५ स्पेशल पर्याय

Mothers Day 2022 : आईला काय देणार खास गिफ्ट? यादगार- पर्सनल टच देणारे ५ स्पेशल पर्याय

Mothers Day 2022 : दिवसरात्र आपल्यासाठी झटणाऱ्या आईचा सन्मान करुन हा दिवस आठवणीत राहील असा सेलिब्रेट करुया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 04:51 PM2022-04-29T16:51:35+5:302022-05-06T12:39:22+5:30

Mothers Day 2022 : दिवसरात्र आपल्यासाठी झटणाऱ्या आईचा सन्मान करुन हा दिवस आठवणीत राहील असा सेलिब्रेट करुया...

Mothers Day 2022: What is a special gift for mother? Memorable - 5 special options that give a personal touch | Mothers Day 2022 : आईला काय देणार खास गिफ्ट? यादगार- पर्सनल टच देणारे ५ स्पेशल पर्याय

Mothers Day 2022 : आईला काय देणार खास गिफ्ट? यादगार- पर्सनल टच देणारे ५ स्पेशल पर्याय

Highlightsआईचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, भावंडे आणि तिचे पूर्वीचे रुप तिला परत पाहता आल्याने ती मनोमन खूश होईल. या दिवशी आईला कामाला पूर्ण सुट्टी द्या आणि तिला छान कुठेतरी फिरायला नेऊन आणा.

आपल्याजवण धनदौलत, संपत्ती, रुप, मान, प्रतिष्ठा हे सगळं असेल आणि आई नसेल तर आपल्या जीवनाला अर्थ नाही असे सांगताना ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटले आहे. याच आईची महती शब्दांत सांगणे कठिण आहे. आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आईची जागा दुसरे कोणीच घेऊ शकत नाही. याच आईचा सन्मान करण्यासाठी मे महिन्याचा दुसरा रविवार जगभरात मदर्स डे (Mothers Day 2022) म्हणून साजरा केला जातो. ही पाश्चात्य संस्कृती आहे असे आपण म्हणत असलो तरी आई आपल्यासाठी दिवसरात्र करत असलेल्या मेहनतीसाठी तिचा सन्मान करणे यात गैर काहीच नाही. झोपेतून उठल्यापासून रात्री आपण झोपेपर्यंत आपल्यासाठी कष्ट करणारी आई म्हणूनच प्रत्येकासाठी खास असते. त्यामुळे या खास दिवसाच्या निमित्ताने आपल्या आईला तुम्हाला काही सरप्राईज द्यायचे असेल तर ही नक्कीच चांगली संधी आहे. आईच्या प्रती आपल्या मनात असणाऱ्या भावना आपण यानिमित्ताने व्यक्त करु शकतो. आता आईच आपल्याला प्रेम, माया, संस्कार अशा अगणित गोष्टी देत असते तर आपण आईला काय देणार हे जरी खरे असले  तरी या निमित्ताने तिच्या आईपणाचे कौतुक करण्यासाठी गिफ्टचे काही खास पर्याय...

 १. पत्रं लिहा 

सध्या व्हॉटसअॅप आणि सोशल मीडियाच्या जमान्यात आपण एकमेकांना पत्र लिहायचे मागे पडले. पत्रातून ज्या भावना व्यक्त होतात त्या इतर कशातूनच होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही आईपासून दूर राहात असाल तर आईला आवर्जून तुमच्या अक्षरात पत्र लिहा. मदर्स डेच्या दिवशी हे पत्र तिच्या हातात पडल्यावर ते वाचताना तिला खूप छान वाटेल. तुमच्या मनात तिच्याविषयी असलेल्या भावनांना यानिमित्ताने वाट मोकळी होईल. त्यातही तुम्ही आईच्या जवळ राहत नसाल तर ही भेट नक्कीच छान होईल.

(Image : Google)
(Image : Google)

२. तिच्या आवडीचे खायला बनवा किंवा ऑर्डर करा

आई नेहमीच आपल्या आवडीनिवडी जपते. सकाळी उठल्यापासून आपल्याला काय हवं नको ते बघते. पण तिच्या आवडीनिवडी ती आपल्यासमोर व्यक्त करतेच असं नाही. घरातील सगळ्यांचे मन जपताना अनेकदा ती स्वत:चे मन मारुन जगत असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही स्वत:च्या हाताने आईसाठी खास काहीतरी बनवले तर तिला आराम तर मिळेलच पण आपल्या आवडीचा पदार्थ खाताना तिला खूप आनंदही होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

३. साडी 

साडी हा तमाम महिलांचा अतिशय आवडीचा विषय असतो. त्यांना कितीही साड्या घेतल्या तरी त्यांना आनंदच होतो. आपल्या आईला कशाप्रकारची साडी साधारण आवडू शकते हे आपल्याला माहित असते. अशावेळी तुम्ही आईच्या आवडीची एखादी छानशई साडी तिला भेट म्हणून नक्की देऊ शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

४. फिरायला न्या

आई सतत घरातली कामं करुन थकते. पण आपण थकलो हेही ती अनेकदा कोणासमोर बोलत नाही. काही दुखत असेल तरी त्याबाबत वाच्यता न करता तसाच सगळा गाडा ओढत राहते. ऑफीस, घर, नातेवाईक असं सगळं करता करता आईला बाहेर फिरायला जायलाही वेळ होत नाही. पण मदर्स डे रविवारी असल्याने या दिवशी आईला कामाला पूर्ण सुट्टी द्या आणि तिला छान कुठेतरी फिरायला नेऊन आणा. यामुळे तिला रोजच्या रुटीनमधून ब्रेकही मिळेल आणि ती रिफ्रेश होईल. तसेच आपल्यालाही तिच्यासोबत छान वेळ घालवता येईल.  

(Image : Google)
(Image : Google)

५. फोटोंचे कोलाज

सध्या सोशल मिडियाच्या जमान्यात अल्बम ही गोष्ट काहीशी मागे पडली. पण जुने फोटो पाहायला सगळ्यांनाच आवडतात. आईचे तिच्या लहानपणीचे काही फोटो असतील तर ते मिळवा. आपल्या घरात तिचे लग्नापासूनचे आणि आपले फोटो आपल्याला सहज सापडू शकतात. यातील चठराविक फोटोंचा कोलाज करा. हे फोटो पाहून आईच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल. यामध्ये आईचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, भावंडे आणि तिचे पूर्वीचे रुप तिला परत पाहता आल्याने ती मनोमन खूश होईल. या फोटोची छानशी फ्रेम करुन आपण ती आईच्या खोलीत लावू शकतो. चला तर मग लागूया मदर्स डेच्या तयारीला....

(Image : Google)
(Image : Google)

Web Title: Mothers Day 2022: What is a special gift for mother? Memorable - 5 special options that give a personal touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.