Lokmat Sakhi >Social Viral > Mother's Day 2024: आईसाठी काहीतरी खूप स्पेशल करायचंय? ५ आयडिया-आई होईल खुश

Mother's Day 2024: आईसाठी काहीतरी खूप स्पेशल करायचंय? ५ आयडिया-आई होईल खुश

Mother's Day Celebration Ideas: मदर्स डे (Mother's Day 2024) निमित्त तुमच्या आईसाठी तुम्हाला एकदम खास असं काही करायचं असेल, पण काय करावं हे सुचत नसेल तर हे काही पर्याय बघा... (5 amazing ideas for celebrating mothers day)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 05:18 PM2024-05-11T17:18:03+5:302024-05-11T18:09:58+5:30

Mother's Day Celebration Ideas: मदर्स डे (Mother's Day 2024) निमित्त तुमच्या आईसाठी तुम्हाला एकदम खास असं काही करायचं असेल, पण काय करावं हे सुचत नसेल तर हे काही पर्याय बघा... (5 amazing ideas for celebrating mothers day)

Mother's Day 2024: Mothers day celebration ideas, how to celebrate mothers day, 5 amazing ideas for celebrating mothers day | Mother's Day 2024: आईसाठी काहीतरी खूप स्पेशल करायचंय? ५ आयडिया-आई होईल खुश

Mother's Day 2024: आईसाठी काहीतरी खूप स्पेशल करायचंय? ५ आयडिया-आई होईल खुश

Highlightsअशा काही साध्या- सोप्या गोष्टी जरी केल्या तरी तुमच्या आईला खूप आनंद होईल आणि एकदम खास वाटेल...

खरंतर आईसाठी आपण कितीही केलं तरी ते कमीच असतं. ती आपल्यासाठी जे काही करते, त्याच्या तुलनेत आपल्याला तिच्यासाठी काही करण्याची संधी खरोखरच खूप कमी मिळते. त्यामुळे जो काही चान्स मिळतो तो अजिबातच गमवावा वाटत नाही. उद्याचा दिवस प्रत्येक आईसाठी खरोखरच खास आहे (Mother's Day 2024). कारण जगभरच तो मोठ्या उत्साहात साजरा होत आहे (how to celebrate mothers day). आता यानिमित्ताने तुम्हालाही तुमच्या आईसाठी काही करायचं असेल, पण काय करावं, ते नेमकं कळत नसेल तर या काही खास आयडिया बघा (Mothers day celebration ideas). अशा काही साध्या- सोप्या गोष्टी जरी केल्या तरी तुमच्या आईला खूप आनंद होईल आणि एकदम खास वाटेल...(5 amazing ideas for celebrating mothers day)

 

मदर्स डे सेलिब्रेशनसाठी खास टिप्स 

१. अगदी दिवसाची सुरुवात झाल्यापासूनच आईला एकदम स्पेशल फिल येऊ द्या. यासाठी आई सकाळी उठण्याच्या आधी तिच्या उशीजवळ किंवा तिला लगेचच दिसेल अशा एखाद्या ठिकाणी फुलांचा गुच्छ, ग्रिटींग आणून ठेवा. ती उठताच तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करा आणि तिला मदर्स डे च्या शुभेच्छा द्या.

ओठांच्या आजुबाजुची त्वचा काळवंडली? तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास, त्याकडे दुर्लक्ष नकोच, कारण.... 

२. उद्याच्या दिवस आईला सगळ्या कामांना सुटी देऊन टाका. तिची कामं तुम्ही करा आणि तिला आराम द्या.

३. दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तिला छान बाहेर घेऊन जा. ती ज्या हॉटेलमध्ये सांगेल तिथे जा, तिच्या आवडीचे पदार्थ खा. नेहमी आपण आपल्या आवडीचंच खातो. आईला काय आवडतं, ते विसरून जातो. त्यामुळे मदर्स डे ला तरी तिच्या आवडीचे पदार्थ मागवा.

 

४. मदर्स डे निमित्त आईला एखादं छानसं गिफ्टदेखील देऊ शकता. आईला काही ना काही तरी घ्यायचं असतंच. पण उद्या घेऊ, नंतर घेऊ म्हणून ती चालढकल करत असते. ती वस्तू नेमकी कोणती याचा शोध घ्या आणि थेट तिच तिला हवी असणारी वस्तू तिच्या पुढे आणून ठेवा... हे सरप्राईज पाहून ती नक्कीच खूश होईल...

वजन भराभर कमी करण्यासाठी चिया सीड्स घ्या, 'असा' करा उपाय- महिनाभरातच चरबी उतरेल 

५. आपल्याला आईला खूप काही सांगायचं असतं. पण तिच्यासमोर बोलता येत नाही. तिच्या विषयीच्या या भावना एका चिठ्ठीत लिहून तिला वाचायला द्या. ते सगळं वाचून काढणं हा आईसाठी आणि तुमच्यासाठीही खूप छान अनुभव असेल.

 

Web Title: Mother's Day 2024: Mothers day celebration ideas, how to celebrate mothers day, 5 amazing ideas for celebrating mothers day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.