Join us  

Mothers Reaction on Sologamy : स्वतः शीच लग्न केलं तर काय झालं, असं मुलीने विचारताच आई म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:29 PM

Mothers Reaction on sologamy : गुजराच्या मुलीनं स्वत:शीच लग्न केल्याचं सांगताच आईनं 'अशी' रिएक्शन दिली; पाहा व्हिडिओ

गुजरातच्या क्षमा बिंदूने नुकतेच स्वतःशी लग्न केल्याने चर्चेत आली. बहुधा भारतातील पहिला  सोलोगामी किंवा स्व-विवाह. हे सारे ऑनलाइनही चर्चेत आहे. लोकांनी सोशल मीडियावरही या बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या सगळ्यात एका आईच्या प्रतिक्रियेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.  हा व्हिडिओ बनवणाऱ्या वैष्णवी श्रीवास्तवने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ही क्लिप पोस्ट केली आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, "आईच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा."

क्लिपमध्ये  दिसते की, मुलगी स्वत:शी लग्न केल्याच्या बातमीवर वडिलांना प्रतिक्रिया विचारते. त्यावर ते म्हणतात की मला काही बोलायचे नाही. यानंतर मुलगी तिच्या आईला विचारते.  आई  मात्र लगेच म्हणते, "ती कदाचित आयुष्यात सर्वात आनंदी असेल." हे ऐकून मुलगी हसते. शेअर केल्यापासून ही व्हिडिओ क्लिप बरीच व्हायरल झाली आहे आणि 8.2 दशलक्षाहून अधिक व्हिव्हज मिळाली आहेत. या पोस्टमुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स पोस्ट करण्याची प्रेरणा मिळाली आहे.  

कोण आहे क्षमा बिंदू?

क्षमाच्या या निर्णयानंतर सोलोगॅमी हा शब्द चर्चेत आला आहे, तर या लग्नाविरोधात अनेक नेत्यांची वक्तव्येही समोर येत आहेत. क्षमा समाजशास्त्रात पदवीधर आहे. सध्या ती एका खासगी कंपनीत एचआर विभागात काम करते. तिचे आई-वडील इंजिनिअर आहेत. तिचे वडील दक्षिण आफ्रिकेत तर आई अहमदाबादमध्ये राहते. तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत, क्षमा म्हणाली होती – मला कधीही कोणत्याही पुरुषाशी लग्न करायचे नव्हते, परंतु मला वधू बनायचे होते, म्हणून मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे सोलोगॅमी?

सोलोगॅमी विवाहाशी संबंधित हे भारतातील पहिले प्रकरण असेल. अमेरिका आणि युरोपातील काही देशांमध्ये स्व-विवाहाची संकल्पना अपरिचित नाही. हा शब्द भारतासाठी नवीन आहे. ज्याप्रमाणे पॉलीगॅमीला बहुपत्नीत्व म्हणतात, मोनोगॅमीला एकपत्नीत्व म्हणतात, तर सोलोगॅमीला स्व-विवाह म्हणतात. स्वतःशी विवाह करण्याचा हा एक मार्ग आहे. सोलोगामीवर क्षमा म्हणते, ही स्वतःशी बांधिलकी आणि स्वतःला स्वीकारण्याचा एक पुढाकार आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया