Lokmat Sakhi >Social Viral > ‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना

‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना

Nirbhaya Squad - १०३ क्रमांकावर फोन केल्यावर महिलांना मिळणार तात्काळ मदत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 03:43 PM2022-01-26T15:43:41+5:302022-01-26T15:46:16+5:30

Nirbhaya Squad - १०३ क्रमांकावर फोन केल्यावर महिलांना मिळणार तात्काळ मदत...

Mumbai Police set up Nirbhaya Squad saying 'Fearless Women - Trademark of Mumbai' | ‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना

‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना

Highlightsअडचणीच्या प्रसंगी महिलांसाठी तत्पर असणाऱ्या निर्भया स्क्वाडचा क्रमांक आपल्याकडेही सेव्ह हवा

मुंबई पोलिस (Mumbai Police) आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असतात. कधी बेशिस्त वाहतुकीला चाप बसवणारे म्हणून, तर कधी गुंडागर्दी करणाऱ्यांना आपला खाक्या दाखवण्यासाठी मुंबई पोलिस तत्पर असल्याचे पाहायला मिळते. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिस दलात निर्भया स्क्वाडची (Nirbhaya Squad) स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी महिलेला असुरक्षित वाटले तरी ती या पथकाची मदत घेऊ शकणार आहे. संकटात असलेल्या महिलांच्या हाकेला त्वरित मदत देणे हे या पथकाचे मुख्य कार्य असणार आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात २४ तास हे पथक सजग असणार आहे. 


 

मुंबई पोलिसांनी याविषयीची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून त्या व्हिडिओचे पॅकेजिंग अतिशय उत्तम पद्धतीने केले आहे. ‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ अशी कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आली आहे. तर या पथकाची माहिती देणारा आणखी एक व्हिडिओही इनस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान जपत त्यांना सुरक्षितता देण्यासाठी मुंबई पोलीसांचे महत्त्वाकांक्षी पाऊल! असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा निर्भया स्क्वाड रात्री-अपरात्री किंवा अगदी दिवसाही बसमध्ये, लोकलमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही महिलेला असुरक्षित वाटले तर हे पथक तिच्या मदतीसाठी धावून येणार आहे. 

महिलांना १०३ हा क्रमांक (103 Helpline) आपल्या मोबाईलवरुन डायल केला की पोलिस संबंधित ठिकाणी काही क्षणात पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या निर्भया स्क्वाडची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिस अशाप्रकारे जनजागृती करत असल्याने तरुणी आणि महिलांना याचा निश्चितच फायदा होईल अशी आशा व्यक्त होताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर मुंबई पोलिसांनी केलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अगदी तासाभरात हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. इतकेच नाही तर अशाप्रकारच्या सुविधेची गरज असल्याचे म्हणत अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. 


कैतरिना कैफ हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुंबई पोलिसांचा हा निर्भया स्क्वाडचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ती म्हणते, निर्भया स्क्वाड मुंबईमध्ये महिलांच्या सेवेसाठी तत्पर आहे, त्यांच्यासाठीच तयार केला आहे. १०३ हा हेल्पलाईन क्रमांक आपल्या स्पीड डायलमध्ये सेव्ह करुन ठेवा आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. याबरोबरच विकी कौशल, शाहिद कपूर, सारा अली खान यांनीही मुंबई पोलिसांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. शाहीद म्हणतो, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकी कौशलनेही महिलांना आपल्या स्पीड डायलमध्ये १०३ क्रमांक सेव्ह करुन ठेवण्याचे आवाहन केले आहे.  
 

Web Title: Mumbai Police set up Nirbhaya Squad saying 'Fearless Women - Trademark of Mumbai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.