Join us  

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 5:59 PM

Mumbai Police Warned Those Who Send Unsolicited Messages To Women; Post Goes Viral सोशल मीडियात मुलींना मेसेज करकरुन छळणाऱ्या अनेकांना इशारा, जरा जपून

मुंबई पोलीसांचे क्रिएटीव्ह पोस्ट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतात. मुंबई पोलीस विनोदी मार्गाने भन्नाट पोस्ट शेअर करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी बहुचर्चित 'जेवलीस का' या प्रश्नावर मुलींनी काय उत्तर द्यावे याची भन्नाट कल्पना दिली आहे. 

संवादाची सुरुवात म्हणून मुलं अनेकदा मुलींना जेवलीस का? असा साधारण मेसेज करतात. या मेसेजला काही महिला प्रचंड वैतागतात. काही लोकं फसवणुकीच्या हेतूने मेसेज करतात. सोशल मिडीयावर ओळख करून ऑनलाईन फसवणूक करतात. सेक्स्टॉर्शन, खंडणी, ऑनलाइन फसवणूकसारख्या गोष्टी अशा अनोळखी लोकांकडून केल्या जातात. समोरून रिप्लाय येत नसेल तर, वारंवार मेसेज करून त्रास देतात. अशाप्रकारे मुलींना त्रास देणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी सूचक पद्धतीने इशारा दिला आहे(Mumbai Police Warned Those Who Send Unsolicited Messages To Women; Post Goes Viral).

व्हायरल पोस्टमध्ये नक्की आहे तरी काय?

मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका संवादाचे स्क्रीनशॉट दिसून येत आहे. यात मेसेज करणारी व्यक्ती एक जुलै रोजी, 'हाय' असा मेसेज करीत आहे. मेसेजचा रिप्लाय न मिळाल्यावर त्या व्यक्तीने पुन्हा २ तारखेला 'हॅलो, जेवलीस का?' असा मेसेज केला आहे.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

म्हणजेच एखाद्याबरोबर संवाद सुरु करण्यासाठी, ऑनलाइन माध्यमातून जसा संवाद सुरु होतो तसं यामध्ये दिसून येत आहे. त्यानंतर 'यू ब्लॉक धिस कॉनटॅक्ट' असं नोटीफिकेशन दाखवण्यात आलं आहे. यावर मुंबई पोलिसांनी जर कोणी आपल्याला मेसेज करून त्रास देत असेल तर, काय करावे याची हिंट दिली आहे.

या संवादाचा स्क्रीनशॉट फोटो शेअर करत मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ''ती मस्त घरी जेवण करेल. तुमच्या अनाठायी काळजीची गरज नाही'' असा खोचक सल्ला पोलिसांनी दिला आहे.

नेटकऱ्यांकडून पोस्टला सलामी

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

या छोट्या पण सूचक पोस्टमधून पोलिसांनी मुलींना एक आयडीया दिली आहे. अनोळखी लोकांशी संवाद साधू नका असा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे क्रिएटीव्ह पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं असून, ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

टॅग्स :मुंबई पोलीससोशल मीडियासोशल व्हायरलइन्स्टाग्राम