कुत्र्यासारखा प्रामाणिक, जीव लावणारा प्राणी नाही (Social Viral). अनेकांचा आवडता पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. या पाळीव प्राण्याला काही लोक घरच्या सदस्याप्रमाणे प्रेम देतात (Pet Lover). पाळीव प्राणी देखील माणसांवर तितकेच जीव लावतात. कुत्र्याचे पालक पाळीव प्राण्याला चांगले जेवण, आरोग्य तपासणी शिवाय खेळणी देखील खेळायला देतात (Viral Video). काही लोक कुत्र्यासाठी खास कपडे देखील विकत आणतात.
अशाच एका श्वानप्रेमी महिलेने पाळीव प्राण्याला, अशी लाखमोलाची वस्तू घेतली आहे, जे पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. मुंबईतील एका महिलेने पाळीव प्राण्याला चक्क अडीच लाखांची सोन्याची साखळी तयार केली आहे. सध्या या महिलेची जोरदार चर्चा होत असून, तिचे पाळीव प्राण्यावर असलेलं प्रेम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे(Mumbai woman buys gold chain worth Rs 2.5 lakh for pet dog, netizens react to viral video).
गळ्यान साखळी सोन्याची..
चेंबूर येथील सरिता सलदान्हा या महिलेने कुत्र्यासाठी खास सोनसाखळी खरेदी केली आहे. तिच्या पाळीव प्राण्याचे नाव टायगर असून, ही सोनसाखळी तिने अनिल ज्वेलर्सकडून तयार करून घेतली आहे. याचा व्हिडिओ दुकानदाराने सोशल मीडियात शेअर केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ काही मिनिटात व्हायरल झाला आहे.
थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद
कुत्र्यासाठी केली अडीच लाखाची सोनसाखळी
सरिता सलदान्हा या चेंबूर परिसरात राहतात. मागच्या महिन्यात त्यांनी टायगरचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सरिता यांनी त्याला सोनसाखळी केली. ही सोनसाखली ३५ ग्रॅमची असून त्याची किंमत अडीच लाखांहून अधिक आहे.
आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. सरिता सोनसाखळी खरेदी करत आहे. सोनसाखळी खरेदी करून ती कुत्र्याच्या गळ्यात घालत आहे. यावेळेस कुत्र्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. दुकानातील मालक, कर्मचारी आणि ग्राहक कौतुकाने त्याच्याकडे बघत असतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओतून आपल्याला कुत्रा आणि माणसाच्या या जगावेगळ्या मैत्रीचे नाते कसे असते, हे दिसून आले.