Join us

अशी कंजूस बहीण बाई! भावाला आइस्क्रिम खावू घालायचं म्हणून ७- ८ दुकानं फिरवले पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 17:04 IST

Viral Video: एखाद्याचा चिकटपणा किती टोकाचा असावा, याचं हे एक मस्त गंमतशीर उदाहरण आहे.. बहिणीची ही ट्रिक मात्र सोशल मिडियावर जाम व्हायरल झाली आहे. 

ठळक मुद्देआतापर्यंत त्यांनी ७ ते ८ आइस्क्रिम पार्लर पालथे घातले. पण तिथल्या आइस्क्रिमच्या किमती पाहून बहिणीने मात्र त्याला आइस्क्रिम घेऊन दिलेले नाही.

भारतीय लोक परदेशात (foreign) गेले की तिथल्या वस्तूंच्या, खाद्य पदार्थांच्या किमती पाहून त्यांचे डोळे फिरतातच. आणि त्यात काही वावगंही नाही. आपल्याकडे ज्या वस्तूला आपण खूप कमी पैसे मोजतो त्याच्या चौपट- पाचपट किंमत देऊन जर परदेशात ती वस्तू विकत घ्यावी लागत असेल, तर कुणालाही जड जाणारच. तसंच या बहिणीचंही झालं आहे. ती काही दिवसांपुर्वीच तिच्या परदेशात राहणाऱ्या भावाकडे गेली. भाऊ- बहिण (brother- sister love) फिरायला निघाले आणि भावाने बहिणीकडे आइस्क्रिम (ice cream) खाऊ घाल म्हणून हट्ट केला. त्यावर बघा या बहिणीने कशी शक्कल लढवली..

 

yourrandomvariable या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विकास यादव असं त्या भावाचं नाव आहे.

व्हिएतनामच्या फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच खाल्ली पाणीपुरी! पाहा पाणीपुरी तोंडात ठेवताच कसा झाला चेहरा..व्हायरल व्हिडिओ

त्यानेच आपली बहिण कसा कंजुसपणा करते आहे, याविषयी एक मजेदार व्हिडिओ तयार करून माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो सांगतो की, ते दोघं बहिण- भाऊ बाहेर फिरायला निघाले आहेत. आइस्क्रिम खाऊ घाल, असा हट्ट भावाने बहिणीकडे केला आहे. म्हणून मागच्या एक- दिड तासापासून दोघेही फिरत आहेत. 

 

आतापर्यंत त्यांनी ७ ते ८ आइस्क्रिम पार्लर पालथे घातले. पण तिथल्या आइस्क्रिमच्या किमती पाहून बहिणीने मात्र त्याला आइस्क्रिम घेऊन दिलेले नाही. त्याऐवजी तिने भावाला जे काही करायला लावले, ते तर खूपच मजेशीर आहे.

आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

ती प्रत्येक आइस्क्रिम पार्लरमध्ये जाऊन भावाला वेगवेगळे आइस्क्रिम ट्राय करायला लावते. एका पार्लरमध्ये जाऊन ५- ६ वेगवेगळ्या फ्लेवरचे आइस्क्रिम टेस्ट करून पाहिले की भावाला तिथून बाहेर काढतेय. शिवाय प्रत्येकवेळी टेस्ट करताना आइस्क्रिमचे जे चमचे मिळतात ते ही गोळा करतेय. घरी जाऊन चहा- साखर- मसाले यांच्या डब्यात ठेवायला ते चमचे कामाला येतील, असा तिचा प्लॅन आहे. पैसे खर्च न करता भरपेट आइस्क्रिम खाण्याचा हा प्लॅन नेटीझन्सला प्रचंड आवडला असून 'रिअल इंडियन वुमन', 'ये है असली इंडियन टॅलेन्ट'असं म्हणून ते तिचं कौतूक करत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलभारतमहिलाइन्स्टाग्राम