Join us  

जलेबी तेरा अंग्रेजी नाम क्या है? पाकिस्तानी हॉटेलने इंग्रजीत सांगितलं जिलेबी म्हणजे काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2023 6:20 PM

‘Mysterious crispy pretzel shaped fried waffles’: Description of jalebis in Pakistani restaurant menu delights netizens पाकिस्तानी हॉटेलचं एक मेन्यूकार्ड व्हायरल झालं, त्यात जिलेबीचं इंग्रजीत वर्णन वाचा..

जिलेबी. विविध सार्वजनिक कार्यक्रम, सण - समारंभ, उत्सव आणि लग्नाच्या पंगतीचंही खास आकर्षण. अस्सल ‘देसी’ पदार्थ.  भारतात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये तर फारच. गुजरातमध्ये याला फाफड्याची जोड मिळाली. महाराष्ट्रात मठ्ठ्याची जोड मिळून लग्नाच्या पंगतीत जिलेबी, मठ्ठा, मसाले भात असे समीकरण तयार झाले. आपला खाद्य इतिहासही सामायिक असल्यानं पाकिस्तानाही जिलेबी लोकप्रिय आहेच. आजवर जिलेबीची अनेक नावं बदलत गेली.

आजही  झेपली, जिलापी, जिलाफी, जुलबीया, जलेबा, झलेबिया, जलेबा, जिलबी, जलेबी, जिलेबी ही सगळी  एका छोट्याश्या जिलेबीची नाव आहेत. परंतु जिलेबीला इंग्रजाळलेलं, बड्या हॉटेलस्टाइल एक आगळं - वेगळं नाव मिळाल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गोष्ट आहे एका पाकिस्तानी रेस्टॉरंटची. त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये जिलबीची जी काय ओळख करुन देण्यात आली आहे ते वाचून अनेकांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले. इतना अंग्रेजी.. म्हणत लोकही जिलबीच्या या वेटोळ्या गरगरीत नावाचा आनंद घेत आहेत(‘Mysterious crispy pretzel shaped fried waffles’: Description of jalebis in Pakistani restaurant menu delights netizens).

जिलेबी.. तेरा मतलब क्या है?

अलीकडेच एका पाकिस्तानी कुकिंग शोमधील ऑडिशन क्लिपचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक स्पर्धक महिला परीक्षकांना कंटेनरमधून बिर्याणी देत ​​असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षदर्शी कुकिंग शो ची ऑडिशन असलयाने तिथे जाऊन पदार्थ बनविणे अपेक्षित होते. परंतु या महिलेने ती बिर्याणी स्वतः न बनवता बाहेरून विकत आणल्याचे कबूल केले होते. असे छोटे छोटे मजेदार किस्से सोशल मीडियाच्या माध्यमांतून लगेच व्हायरल होतात. तसेच नेटकरीसुद्धा हे पाहून त्याचा भरपूर आनंद घेतात. असाच काहीसा किस्सा आपल्या भारतात सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिलेबी सोबत झाला आहे.  

अनुवादक आणि बुकर विजेत्या डेझी रॉकवेल हीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तानी रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डचा फोटो शेअर केला आहे. ज्यात जिलेबी म्हणजे काय याचे इंग्रजीत वर्णन आहे. ते असे, “Mysterious crispy pretzel shaped fried waffles soaked in rose water syrup”. जिलेबीचे हे असे कधीही न केलेले अफलातून वर्णन" असं म्हणत तिने पाकिस्तानी रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डचा फोटो शेअर केला आहे. या रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमध्ये, गुलाबजाम, फिरनी, हलवा, दही की खीर, फ्रूटी कुल्फी, शाही तुकडा यांसारख्या इतर गोड पदार्थांची देखील गमतीशीर व्याख्या केलेली दिसते.

इंग्रजी ग्यान पाहून नेटिझन्स मात्र म्हणाले..

जिलेबीचे केलेले हे अजब - गजब वर्णन पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. "जिलेबीची तुलना प्रेटझेल व वॅफल्स यांसारख्या पदार्थांबरोबर तुलना केल्याचे खूप आवडले". अशी प्रतिक्रिया एकाची तर दुसरा युजर म्हणतो.  मला आताच्या आता गुलाब पाण्याच्या सरबतात भिजवलेले, कुरकुरीत प्रेटझेल आकाराचे तळलेले वॅफल्स खायला हवे आहेत! अनेकांच्या कल्पनाशक्तीला नुसता जिलेबीचा फोटो पाहून बहर आला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल