ज्यांची लहान मुलं सध्या शाळांमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी PTM हा शब्द खूपच परवलीचा झाला आहे. PTM म्हणजेच Parents Teachers Meet. हल्ली महिन्यातून एक दिवस खास PTM साठी राखून ठेवलेला असतो. पालकही त्या दिवशी त्यांचे इतर सगळे प्रोग्राम बाजूला ठेवतात आणि एक- दोन तासांचा वेळ मुलांच्या PTM साठी राखून ठेवतात. पुर्वी मराठी शाळा होत्या. त्यामुळे मग PTM ऐवजी पालकसभा हा शब्द वापरला जायचा. त्या पालक सभाही अगदी २- ३ महिन्यांतून एकदाच व्हायच्या... तर सांगायचा मुद्दा असा की केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनाही नुकताच PTM सारखा अनुभव आला...
स्मृती इराणी या सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत असून ते त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत.
थंडीमुळे त्वचा कोरडी पडून भुरकट दिसते? आंघोळ करताना फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या, त्वचा राहील मुलायम
त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले स्मृती इराणींचे वडील आणि खुद्द स्मृती इराणीही फोटोमध्ये आहेत. स्मृती इराणींच्या वडिलांचे आणि नरेंद्र मोदी यांचे काहीतरी बोलणे सुरू असून स्मृती इराणी ते ऐकत आहेत.
"When THE BOSS meets THE FATHER ….", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं असून त्या पुढे असंही सांगत आहेत की ते दोघे स्मृती इराणी यांच्याविषयीच बोलत आहेत.
'या' ६ प्रकारच्या साड्या नेहमीच देतात 'क्लासी लूक'! मेंटेन करायला आणि नेसायलाही अगदी सोप्या...
ते त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार करत नाहीयेत. उलट बाेलण्यातून स्मृती यांचं कौतूकच होत आहे. हा प्रसंग पाहून स्मृती यांना शाळेची PTM आठवली असून "#PTM chal rahi hai" असं मजेशीर वाक्यही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.