Join us  

कोण उर्वशी रौतेला, मला नाही माहित! व्हायरल व्हिडिओवर नसीम शाह हसत असं का म्हणाला, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 4:24 PM

Naseem Shah Reacts on Viral Video with Urvashi Rautela Relationship Trolling : ट्रोलींगनंतर तिने हा व्हिडिओ डीलीट केला. आता नसीमने उर्वशीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे, ते काय आहे पाहूया...

ठळक मुद्देउर्वशीचे आणि नसीम यांच्यात खरंच काही नाते आहे का, की त्यांची नावे उगाचच जोडली जात आहेतनसीमने उर्वशी आणि त्याच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

पाकिस्तानचा प्रसिद्ध गोलंदाजपटू नसीम शाह गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत असलेल्या नात्यावरुन बराच चर्चेत आहे. उर्वशीने एक रोमॅंटीक रील व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. ज्या व्हिडिओनंतर पुन्हा उर्वशी आणि नसीम यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली. तर या व्हिडिओमध्ये उर्वशी दुबई स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटताना दिसत होती. तर नसीम तिला पाहून हसताना दिसत होती आणि ती काहीशी लाजत असल्याचे दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर उर्वशीला बरेच ट्रोल कऱण्यात आले. तिच्या फॅन्सनी इन्स्टाग्रामच्या फॅनपेजवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिने तो शेअर केला होता. मात्र ट्रोलींगनंतर तिने हा व्हिडिओ डीलीट केला. आता नसीमने उर्वशीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे, ते काय आहे पाहूया...

काय म्हणाला नसीम?

उर्वशी कोण आहे? काय आहे? माहित नाही लोक अशाप्रकारचे व्हिडिओ का बनवतात. माझा आता असा काहीच प्लॅन नाहीये. माझे लक्ष आता फक्त क्रिकेटवर आहे आणि मला क्रिकेट खेळायची आहे. अशाप्रकारे नसीमने उर्वशी आणि त्याच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता त्याच्या या वक्तव्यावर उर्वशी काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

(Image : Google)

उर्वशी आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्यामध्येही अफेयर असल्याची बरीच चर्चा होती. मात्र या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि ते वेगळे झाले हे जगजाहिर आहे. उर्वशी आता २८ वर्षांची असून ऋषभ २४ वर्षांचा आहे. तर नसीम अवघ्या १९ वर्षांचा आहे. या तिघांच्या लव्ह ट्रॅंगलवरुन त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. आता उर्वशीचे आणि नसीम यांच्यात खरंच काही नाते आहे का, की त्यांची नावे उगाचच जोडली जात आहेत याबाबत ठोस वक्यव्य करणे योग्य ठरणार नाही. कोणाला मी आवडत असेन तर ती चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी कोणी क्रिकेट सामना पाहायला येत असेल तर तीही चांगलीच गोष्ट आहे असेही नसीम म्हणाला आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाउर्वशी रौतेलाट्रोल