आज अगदी प्रत्येक क्षेत्रात महिला धडाडीने काम करत आहेत. आपण चंद्रयान, सुर्ययान अंतराळात पाठवले. त्या मोठमोठाल्या मोहिमांमध्येही महिलांनी दिलेले योगदान प्रबळ होतेच. असे क्वचितच एखादे क्षेत्र असेल जिथे आज भारतीय महिला सक्षम नसेल. पण तरीही एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे अजूनही कित्येक बालिका शिक्षण, संधी, आरोग्य, सुरक्षितता यापासून वंचितच आहेत. त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी २०१५ या वर्षीपासून २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून साजरा करण्यात येतो. यादिनाचे औचित्य साधून अभिनेत्री काजोल हिनेही न्यासासाठी आणि ज्यांना मुली आहेत, त्या सगळ्यांसाठीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Emotional post of Kajol for her daughter Nyasa)
काजोल न्यासासाठी किंवा युगसाठी ज्या काही पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत असते, त्यातून नेहमीच असं वाटतं की ती एक जबाबदार आई असून तिच्या मुलांविषयी, त्यांच्या जडणघडणीविषयी तिच्या काही ठाम भूमिका आहेत.
मुलांना मातीत, गवतामध्ये अनवाणी चालू द्या आणि तुम्हीही चाला, कारण..... वाचा ५ जबरदस्त फायदे
काजोलने नुकतीच शेअर केलेली पोस्टदेखील अशाच धाटणीने जाणारी आहे. या पोस्टमध्ये काजोल म्हणत आहे की ज्यांना मुली आहेत, त्यांना नेहमीच ही काळजी असते की जगाकडून तुमच्या मुलीच्या वाट्याला नेमके काय येईल, हे जग त्यांना काय देऊ करेल... तिच्या पुरुष सहकाऱ्याच्या बरोबरीने ती उभी राहू शकेल का? आणि उभं राहताना हे जग तिला साथ देईल का?
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त तिने मुली असणाऱ्या सगळ्याच पालकांना असं आवाहन केलं आहे की चला आता आपणच आपल्या मुलींना एवढं सक्षम करूया की जगाने त्यांना साथ दिली किंवा नाही दिली तरी त्या स्वत:च नेहमी त्यांच्या स्वत:साठी खंबीरपणे उभं राहू शकतील.
रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..
आणि या जगाला आपणच एक अशी जागा बनवूया जिथे फक्त आपल्या मुलींचीच नाही, तर त्यांच्याही मुलींची भरभराट होईल. काजोलच्या स्वप्नातली ही सक्षमता सगळ्याच मुलींमध्ये आली तर भविष्यात बालिका दिन साजरा करण्याची गरजच उरणार नाही....