नोव्हेंबर महिन्यात अनेक दिग्गच जणांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. शिवाय विविध प्रकारचे दिनविशेष साजरे होतात. आज ६ नोव्हेंबर, या दिवशी अनेक दिग्गच लोकांचा जन्म झालाच, शिवाय एका चविष्ट पदार्थाचा देखील शोध लावण्यात आला होता. ६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय नाचोस दिवस (National Nachos Day) म्हणून साजरा करण्यात येतो. नाचोस ही खरंतर मेक्सिकन रेसिपी आहे. पण या पदार्थाला आवडीने जगातील प्रत्येक कोपऱ्यातील नागरिक खातो. कुरकुरीत-तोंडात टाकताच जिभेची चव वाढवणारा नाचोस ही रेसिपी उदयास कशी आली. या पदार्थाचा नेमका इतिहास काय? पाहूयात.
सध्या प्रत्येक जण स्नॅक्समध्ये आवडीने नाचोस खातो. कुरकुरीत-खमंग नाचोस आता प्रत्येक स्टोरमध्ये उपलब्ध आहे. पण नाचोसचा जन्म कसा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाचोसचा जन्म मेक्सिकोमधील पिएड्रास नेग्रास या शहरात झाला. खरंतर नाचोसची कथा ही थोडी रंजक आहे. या चविष्ट डिशचा शोध शिल्लक राहिलेल्या गोष्टींपासून लावण्यात आला होता(National Nachos Day 2023: Date, history, significance).
दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर
इग्नासियो नाचो अनाया या शेफने १९४३ साली व्हिक्टरी क्लब रेस्टॉरंटमध्ये नाचोसचा शोध लावला होता. मेक्सिकोमधील टेक्सासच्या सीमेपासून दोन मैलांवर असलेल्या, व्हिक्टरी क्लब रेस्टॉरंट हे त्याकाळी खूप प्रसिद्ध होते. नाचोसची लोकप्रियता वाढल्यानंतर अनायाला शेफ म्हणून पदोन्नती देण्यात आली. नंतर १९६० साली त्यांनी स्वतःचे रेस्टॉरंट देखील सुरू केले.
पण नाचोसचा जन्म झाला तरी कसा?
व्हिक्टरी क्लब रेस्टॉरंट हे खरंतर अमेरिकेच्या सीमेजवळील आणि अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रिय असलेले रेस्टॉरंट होय. १९४३ साली वर्ल्ड वॉर २मध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या बायकांनी मिळून एका रेस्टॉरंटला भेट दिली. त्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये जेवण शिल्लक राहिले नव्हते.
दिवाळीच्या साफसफाईत झुरळांचा बंदोबस्त करा, ४ सोप्या टिप्स- झुरळं होतील घरातून गायब
अशा स्थितीत अनाया यांनी टॉर्टिला (चपाती), चीज आणि जालापेनो मिरचीचा वापर करून नवीन डिश तयार केली. त्यावेळेस शेफ यांनी शक्कल लढवून टॉर्टिलाच्या छोट्या कापांवर चीज, मिरचीसह इतर साहित्य पसरवून बेक केले. तेव्हा महिलांनी या डिशचे नाव विचारले असता, तेव्हा त्यांनी "नाचोस स्पेशियल्स" असे सांगितले. तेव्हापासून, नाचोस जगभरातील लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.
डिश इतकी लोकप्रिय झाली की, व्हिक्टरी क्लबचे मालक, रॉबर्टो डे लॉस सॅंटोस यांनी मेन्यूवर या डिशला विशेष स्थान दिले. १९६१ साली जेव्हा व्हिक्टरी क्लब बंद झाले, तेव्हा अनायाने पिएड्रास नेग्रासमध्ये स्वतःचे नाचोसच्या नावाने रेस्टॉरंटची स्थापना केली.