Lokmat Sakhi >Social Viral > National Spoon of India ! ‘त्याला’ राष्ट्रीय चमचा जाहीर करा अशी मागणी का करतोय हा तरुण?

National Spoon of India ! ‘त्याला’ राष्ट्रीय चमचा जाहीर करा अशी मागणी का करतोय हा तरुण?

National Spoon of India : ही व्हायरल पोस्ट यूजर्सना खूप आवडली. पोस्टशी संबंधित मीम्सही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनवले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:22 PM2022-08-24T18:22:41+5:302022-08-26T13:44:56+5:30

National Spoon of India : ही व्हायरल पोस्ट यूजर्सना खूप आवडली. पोस्टशी संबंधित मीम्सही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनवले जात आहेत.

National Spoon of India : User call national spoon of india photo goes viral | National Spoon of India ! ‘त्याला’ राष्ट्रीय चमचा जाहीर करा अशी मागणी का करतोय हा तरुण?

National Spoon of India ! ‘त्याला’ राष्ट्रीय चमचा जाहीर करा अशी मागणी का करतोय हा तरुण?

आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक भांड्याचे स्वतःचे महत्त्व आहे. जसे काही भांड्यांमध्ये पाहुण्यांना अन्न दिले जाते आणि काही भांड्यांमध्ये आपण दररोज अन्न खातो. पण अलीकडेच कटलरीशी संबंधित एक नवीन गोष्ट समोर आली आहे. वास्तविक एका व्यक्तीने पोस्ट शेअर करून चमच्याला राष्ट्रीय चमचा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या आजूबाजूला बरेच चमचे असतात. प्रत्येक चमचाची एक वेगळी खासियत असते.  प्रत्येक चमच्याचा आकार, वापर वेगळा. याच चमच्याचं महत्व ओळखून या तरूणीनं सोशल मीडियावर चमच्याचं पेटंट मागितलं आहे. (User call national spoon of india photo goes viral)

तुम्ही आजपर्यंत किती प्रकारचे चमचे पाहिले असतील, पण राष्ट्रीय चमच्याबद्दल तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का? अलीकडेच एका Reddit वापरकर्त्याने एका विशिष्ट प्रकारच्या चमच्याचे छायाचित्र पोस्ट केले आणि त्याला भारताचा राष्ट्रीय चमचा म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले. युजरने पोस्टवर असेही लिहिले की, जर तुमच्याकडे हा चमचा असेलच, फोटोमध्ये दिसत असलेल्या चमच्यावर एक अतिशय सुरेख रचना दिसते.

युजरर्सनं दिली अशी रिएक्शन

ही व्हायरल पोस्ट यूजर्सना खूप आवडली. पोस्टशी संबंधित मीम्सही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनवले जात आहेत. लोक कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.  अनेक वापरकर्ते म्हणतात की त्यांच्या घरातही हा चमचा आहे. त्याचवेळी एका यूजरने त्यांच्या घरातील हा चमचा हरवल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

हा चमचा केवळ भारतातीलच नाही तर इतर देशांतील लोकांकडेही आहे. व्हायरल पोस्टमध्ये दिसणार्‍या या चमच्याची रचना अगदी सामान्य आहे आणि अनेकांच्या घरी या डिझाइनचा चमचा असतो. यामुळेच लोक या व्हायरल पोस्टशी नाते जोडू लागले आहेत. असा चमचा तुमच्याकडे आहे की नाही हे कमेंट्स विभागात सांगा.

Web Title: National Spoon of India : User call national spoon of india photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.