Lokmat Sakhi >Social Viral > घरात मुंग्यांनी थैमान घातले आहे? ५ घरगुती उपाय, न मारता मुंग्यांना पळवून लावा..

घरात मुंग्यांनी थैमान घातले आहे? ५ घरगुती उपाय, न मारता मुंग्यांना पळवून लावा..

Natural ways to get rid of ants from your home किचनमधील हे ५ उपाय - मुंग्यांना पळवून लावण्यासाठी करतील मदत, पाहा याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2023 03:31 PM2023-05-07T15:31:38+5:302023-05-07T15:32:20+5:30

Natural ways to get rid of ants from your home किचनमधील हे ५ उपाय - मुंग्यांना पळवून लावण्यासाठी करतील मदत, पाहा याचा वापर

Natural ways to get rid of ants from your home | घरात मुंग्यांनी थैमान घातले आहे? ५ घरगुती उपाय, न मारता मुंग्यांना पळवून लावा..

घरात मुंग्यांनी थैमान घातले आहे? ५ घरगुती उपाय, न मारता मुंग्यांना पळवून लावा..

गोड पदार्थांना मुंग्या लगेच लागतात. एखादा गोड पदार्थ खात असताना खाली पडला की, त्याला मुंग्या चिकटलेच म्हणून समजा. त्याच्या भोवतीने मुंग्यांच्या रांगा लागतात. कालांतराने त्या ठिकाणी मुंग्यांचा वावर इतका वाढतो की, मुंग्या कपड्यांवर चढून चावा घेतात. मुंग्यांचीही दहशत माणसांसाठी हानिकारक ठरू शकते. मुंग्या दोन प्रकारचे असतात. काळे आणि लाल.

लाल मुंग्या खूप चावतात. ज्यामुळे जीव नकोसा होतो. मुंग्यांपासून सुटका मिळवणे कठीण जाते. त्यांना कितीही घालवण्याचा प्रयत्न केलं तरी देखील ते पुन्हा येतात. मुंग्यांना कायमचं पळवून लावायचं असेल तर, हे काही उपाय करून पाहा. या सोप्या उपायांमुळे मुंग्यांपासून तुमची व घराची सुटका होईल(Natural ways to get rid of ants from your home).

मीठ

मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी आपण मिठाचा वापर करू शकता. मिठाला पाण्यात उकळवून, हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा, व ज्या ठिकाणी मुंग्या जास्त आहे तिथे शिंपडा. यामुळे काही मिनिटात मुंग्या गायब होतील.

शेगडीची फ्लेम कमी झालीय? ३ सोपे उपाय; वेळ वाचेल- होईल स्वयंपाक झरझर

पुदिना

पुदिन्याचा वापर स्वयंपाक घरात होतो. उन्हाळ्यात मुंग्या भरपूर येतात. यासाठी आपण पुदिन्याच्या पानांचा वापर करू शकता. वास्तविक, मुंग्या पुदिन्याचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत, त्यामुळे मुंग्या त्या ठिकाणाहून लगेच पळ काढतात. यासाठी पुदिन्याची पाने पाण्यात उकळवा. व त्यात इसेंशियल ऑइल मिक्स करा. हे मिश्रण बॉटलमध्ये भरा, व ज्या ठिकाणी मुंग्यांचा वावर आहे, त्या ठिकाणी शिंपडा. यामुळे मुंग्या पळून जातील.

दालचिनी

दालचिनीमधील उग्र वास मुंग्या सहन करू शकत नाही, याचा प्रभाव तीव्र असतो. त्यामुळे मुंग्या पळून जातात. यासाठी दालचिनीची पावडर करा. व त्यात इसेंशियल ऑइल मिक्स करा. ही पावडर मुंग्या असलेल्या जागेवर पसरवा. काही मिनिटात मुंग्या छुमंतर होतील.

चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...

काळीमिरी

मुंग्यांना काळीमिरीचा तीव्र गंध सहन होत नाही. यासाठी काळीमिरीची पावडर तयार करा. व ज्या ठिकाणी मुंग्या जास्त आहेत, त्या ठिकाणी ही पावडर शिंपडा. यामुळे मुंग्या त्या ठिकाणी पुन्हा येणार नाही.

नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..

लिंबू

लिंबाचा गंध तीव्र असतो, त्यामुळे लहान कीटक लगेच पळ काढतात. मुंग्यांना पळवून लावण्यासाठी, फरशी पुसताना पाण्यात लिंबाचा रस मिसळा, यामुळे फरशीमधील कीटक मरतील, व मुंग्या देखील येणार नाही. 

Web Title: Natural ways to get rid of ants from your home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.