Lokmat Sakhi >Social Viral > प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, गाडी लागण्याचा त्रास गायब, प्रवास होईल आनंदात

प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, गाडी लागण्याचा त्रास गायब, प्रवास होईल आनंदात

Simple remedies to avoid motion sickness: प्रवासात मळमळ- उलट्या किंवा गाडी लागणं असा त्रास होत असेल तर त्यावर काय उपाय करता येतील ते पाहा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 02:19 PM2023-12-27T14:19:33+5:302023-12-27T16:56:37+5:30

Simple remedies to avoid motion sickness: प्रवासात मळमळ- उलट्या किंवा गाडी लागणं असा त्रास होत असेल तर त्यावर काय उपाय करता येतील ते पाहा.. 

Nausea and vomiting during travel? Simple remedies to avoid motion sickness, How to avoid vomating during journey? Home remedies to get rid of motion sickness | प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, गाडी लागण्याचा त्रास गायब, प्रवास होईल आनंदात

प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, गाडी लागण्याचा त्रास गायब, प्रवास होईल आनंदात

Highlightsइतरांचा आणि तुमचाही प्रवास खराब होऊ नये म्हणून प्रवासाला निघताना हे काही उपाय करा.

सुहाना सफर.... असं म्हणत काही जण मोठ्या उत्साहात प्रवासाला निघतात. सध्या तर नाताळाच्या सुट्या आहेत. त्यामुळे या सुट्यांचा छान उपयोग करून काही हौशी मंडळी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटनस्थळी जाण्याचा प्लॅन आखतात. मोठ्या उत्साहात प्रवासाची सगळी तयारी केली जाते. पण गाडीमध्ये बसताच काही जणांना मळमळ- उलट्या असा त्रास सुरू होतो (Simple remedies to avoid motion sickness). विशेषकरून लहान मुलांना आणि महिलांना हा त्रास जास्त जाणवतो (How to avoid vomating during journey?). गाडीत कुणालाही असा त्रास झाला की मग त्याचा वैताग सगळ्यांनाच येतो. म्हणूनच इतरांचा आणि तुमचाही प्रवास खराब होऊ नये म्हणून प्रवासाला निघताना हे काही उपाय करा.(Home remedies to get rid of motion sickness)

 

प्रवासात त्रास होऊ नये म्हणून उपाय 

१. प्रवासाला निघण्याच्या आदल्या रात्री ८ ते १० तासांची झोप घ्या. जागरण कटाक्षाने टाळा.

कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

२. सलग प्रवास करणं टाळा. दर दिड- दोन तासांनी छोटासा ब्रेक घ्या. त्यावेळी गाडीतून खाली उतरा आणि मोकळ्या हवेत एक- दोन मिनिटे उभे राहा. यावेळी दिर्घ श्वसन केल्यास अधिक चांगले.

३. घरातून जेव्हा प्रवासासाठी निघाल तेव्हा एखादं केळ खाऊन निघा. यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.

 

४. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी ६ च्या सप्लिमेंट्स सोबत ठेवा. यामुळे थकवा, डोकेदुखी असा त्रास प्रवासात होत नाही.

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

५. मळमळ होतेय असं वाटलं तर थोड्या थोड्या वेळाने काजू आणि मनुका तोंडात टाका. 

६. प्रवासात काही खावं वाटलंच तर व्हेज सॅण्डविच खाण्यास प्राधान्य द्या.

 

Web Title: Nausea and vomiting during travel? Simple remedies to avoid motion sickness, How to avoid vomating during journey? Home remedies to get rid of motion sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.