Join us  

कोणतीही मेहनत न घेता चांदी- पितळ आणि तांब्याचा कलश १० मिनिटांत होईल चकाचक, पाहा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 3:07 PM

Navratri 2024: नवरात्रीतील घटस्थापनेसाठी तुमच्या घरातला कलश घासून पुसून स्वच्छ करायचा असेल तर हे उपाय तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात. (best trick to clean silver, brass and copper kalash with simple and easy tricks)

ठळक मुद्देतुमचं अवघड काम नक्कीच सोपं होईल आणि तुमच्या घरचा कलश अगदी लख्खं चमकेल..

नवरात्रीच्या निमित्ताने घरोघरी कलश स्थापना केली जाते. त्यालाच घटस्थापना असेही म्हणतात (Navaratri 2024). घटस्थापनेसाठी आपापल्या घरातल्या परंपरेप्रमाणे काही ठिकाणी मातीचा तर काही ठिकाणी चांदी, पितळ, तांबे असा धातूचा कलश बसविला जातो. आता तुमच्या घरी सुद्धा धातूचा कलश स्थापित करण्याची परंपरा असेल तर तो कलश आपण व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ करतो. कमीतकमी मेहनतीत चांदीचा, पितळाचा किंवा तांब्याचा कलश घासून कसा स्वच्छ करायचा याचे हे काही सोपे उपाय पाहा.. तुमचं अवघड काम नक्कीच सोपं होईल आणि तुमच्या घरचा कलश अगदी लख्खं चमकेल.. (best trick to clean silver, brass and copper kalash with simple and easy tricks)

 

१. चांदीचा कलश स्वच्छ करण्यासाठी..

चांदीचा कलश स्वच्छ करण्यासाठी एक भांडे घ्या. त्या भांड्याच्या तळाशी ॲल्युमिनियम फॉईल लावून ठेवा. आता त्या भांड्यात गरम पाणी टाका. त्यामध्ये २ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि १ टीस्पून मीठ टाका.

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यात चांदीचा कलश काही मिनिटांसाठी बुडवून ठेवा. काही सेकंदातच कलश स्वच्छ दिसू लागेल. यानंतर पाणी काेमट झाल्यावर कलश काढून घ्या आणि घासणीने हलकासा घासून घ्या. लगेचच अगदी चकाचक दिसू लागेल.

 

२. पितळाचा कलश स्वच्छ करण्याचा उपाय

एका भांड्यात कलश व्यवस्थित बुडेल एवढं गरम पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा डिटर्जंट पावडर आणि एका लिंबाचा रस पिळा आणि त्यात पितळाचा कलश काही काळासाठी बुडवून ठेवा.

दारासमोर रोज कशी रांगोळी काढावी सुचतच नाही? ७ सोप्या डिझाईन्स, २ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी

त्यानंतर कलशासह ते भांडं गॅसवर गरम करायला ठेवा आणि पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर कलश बाहेर काढा आणि घासणीने घासून घ्या. त्यावर वेगळीच चमक आलेली दिसेल. 

 

३. तांब्याचा कलश कसा स्वच्छ करावा?

तांब्याचा कलश स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू यासारख्या घरातल्या आंबट वस्तूंचा उपयोग करू शकता. त्याशिवाय एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यामध्ये १ ते दिड कप व्हाईट व्हिनेगर आणि थोडा बेकिंग सोडा टाका.

दांडिया- गरबा खेळण्यासाठी ओढणी पिनअप करण्याच्या ३ सुंदर स्टाईल, दिसाल मस्त- खेळा बिंधास्त

या पाण्यात तांब्याचा कलश भिजत ठेवा. काही मिनिटांनी कलश पाण्याबाहेर काढा, तो बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झालेला दिसेल. त्यानंतर डिशवॉश लिक्विड आणि थोडं मीठ लावून घासून काढा. अगदी चकाचक होईल. 

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्री पूजा विधी २०२४खरेदीसोशल व्हायरल