नवरात्र सुरू झालं की आपण सुरुवातीला उत्साहाच्या भरात दांडिया किंवा गरबा खेळतो (Navaratri dandiya garba special). एक- दोन दिवस काही वाटत नाही. पण नंतर मात्र पाय ठणकू लागतात. आपलं रोजचं काम करणंही मग अवघड होऊ लागतं (How to get relief from leg pain?). पण हौस एवढी असते की तसेच दुखरे पाय घेऊन आपण पुन्हा दांडिया खेळायला सज्ज होतो. कारण दांडिया किंवा गरब्याची धमाल पुन्हा वर्षभर करायला मिळत नाही. म्हणूनच आता दांडिया खेळून आलं की हे काही उपाय करा (Home remedies for leg pain). दुखऱ्या पायांना लगेच आराम मिळेल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमात दणादण दांडिया खेळायला सज्ज व्हाल.
पाय खूप दुखत असतील तर काय उपाय करावा?
१. मीठाचे पाणी
मीठामध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या शरीरातील आखडलेल्या नस मोकळे व्हायला मदत होते.
दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी
म्हणूनच आता दुखऱ्या पायांसाठी मिठाचा वापर कसा करायचा ते पाहूया. यासाठी एका मोठ्या बादलीत गरम पाणी घ्या. पाणी अगदी कोमट नसावे आणि पायांना चटका बसेल एवढे कडकही नसावे. अर्धी बादली गरम पाणी असेल तर त्यात २ टेबलस्पून मीठ घाला. पाण्यात मीठ पुर्णपणे विरघळल्यावर त्या पाण्यात पाय सोडून बसा. गरम पाणी कोमट होईपर्यंत पाय पाण्यातच ठेवा. हा उपाय केल्याने पाय दुखणं कमी होईल.
२. एप्सम सॉल्ट
मीठाचा हा एक प्रकार पायांच्या वेदना कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. हे मीठ तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवू शकता किंवा मग कोणत्याही मेडिकलमधून विकत घेऊ शकता.
ग्रे रंगाची साडी नेसली तर कसा करायचा मेकअप? दागिन्यांची निवड?
हा उपाय करण्यासाठीही अर्धी बादली गरम पाणी घ्या. त्यात एप्सम सॉल्ट टाका आणि त्या पाण्यात पाय बुडवून बसा. वेदन कमी करण्यासाठी हे मीठ अतिशय उपयोगी ठरते.
३. तळपायांना मालिश
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी पाय मीठाच्या गरम पाण्यात काही वेळ बुडवून ठेवा.
४० हजारांची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यात हिऱ्याचं लखलखतं नेकलेस- बघा सोनम कपूरचा सुंदर थाट
त्यानंतर पाय कोरडे करून घ्या आणि मग तुमच्या घरात असलेल्या एखाद्या तेलाने किंवा बामने तळपायांना मसाज करा. पायाची बोटे ओढा तसेच टाचेलाही मसाज करा. यामुळे पायाचे दुखणे मोकळे होईल.