नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना कर्करोग झाल्याचे निदान नुकतेच झाले. स्टेज टू कॅन्सर असल्याचे समजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. नवज्योत सिंग सिद्धू सध्या पटियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. स्वत: डॉक्टर आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नवज्योत कौर यांनी आपल्या पतीला एक पत्र लिहिले आहे. ते पत्र अत्यंत भावूक आहे. पूर्वी कपील शर्मा शोमध्ये हे दोघे पती-पत्नी आलेले असताना त्यांची आपसातली नोकझोक, खट्याळ संवाद हे सारे अनेकांना ते पत्र वाचून आठवले असेल.नवज्योत सिंग सिद्धू यांना रोड रेजप्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता ते तुरुंगात आहेत(Navjot Singh Sidhu's Wife Diagnosed With Cancer, Pens Letter To Jailed Husband).
त्यांच्या पत्नीला नुकताच कॅन्सर झाला. त्यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्ट केली. त्यात त्या म्हणतात, तुम्ही एका गुन्ह्यासाठी तुरुंगात आहात, असा गुन्हा जो तुम्ही केलाच नाही. यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना तुम्ही माफ करा. तुरुंगाबाहेर दररोज तुमची वाट पाहणे कदाचित मला तुमच्यापेक्षा जास्त त्रास देत आहे. नेहमीप्रमाणे दु:ख वाटून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मला माहिती आहे की, ही खूप वाईट वेळ आहे. पण हे दिवसही पालटतील.
तुम्हाला वारंवार न्यायापासून वंचित होताना पाहत मी तुमची प्रतीक्षा करते आहे. सत्य खूप शक्तिशाली आहे, परंतु ते वेळोवेळी तुमची परीक्षा घेत आहे. हे कलयुग आहे. सॉरी, तुमची प्रतीक्षा करू शकत नाही, कारण हा स्टेज २ चा कॅन्सर मला घेरतो आहे. कोणालाही दोष देऊ नये, हीच देवाची इच्छा असेल..’
ही पोस्ट तर इमोशनल करणारी आहेच. स्वत: डॉक्टर असलेल्या नवज्योतही आपल्याला झालेल्या आजाराने धास्तावल्या आहेत. कौटूंबिक अस्वस्थताच त्यांनी मांडली आहे.