Lokmat Sakhi >Social Viral > नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

Navratri 2022 : देवी आईला प्रसन्न करण्यासाठी मुलं-मुली तिच्यासमोर गरबा करतात. हा सोहळा पाहण्यासाठीही अनेकजण येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:04 PM2022-09-26T16:04:54+5:302022-09-26T16:34:48+5:30

Navratri 2022 : देवी आईला प्रसन्न करण्यासाठी मुलं-मुली तिच्यासमोर गरबा करतात. हा सोहळा पाहण्यासाठीही अनेकजण येतात.

Navratri 2022 : Mistakes not to do during navratri garba | नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

सध्या देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. (Navratri 2022) प्रत्येकजण देवीला प्रसन्न करण्यात मग्न आहे. अशा स्थितीत लोक पूजेपासून उपवासापर्यंत अनेक गोष्टी करतात. असे म्हणतात की या दिवशी माता राणीला प्रसन्न करण्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.  नवरात्रीत गरबा खूप खेळला जातो. (Mistakes not to do during navratri garba)

देवी आईला प्रसन्न करण्यासाठी मुलं-मुली तिच्यासमोर गरबा करतात. हा सोहळा पाहण्यासाठीही अनेकजण येतात. ठिकठिकाणी वेगवेगळ्या शैलीत गरबा खेळला जातो. लोक या गारबासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू करतात. पण गरबा खेळताना अनेकवेळा कळत-नकळत त्यांच्याकडूनही चुका होतात. या चुका त्यांना महागातही पडू शकतात. म्हणूनच गरबा खेळताना काही चुका टाळायला हव्यात.

१) जरी तुम्ही गरबा खेळलात तरी पूर्ण समर्पणाने खेळा. दररोज गरबा करताना अनेक वेळा काही लोक आळशी होतात आणि त्यांच्या मनात गरबा करण्याची इच्छा नसते. अशा वेळी दुःखी मनाने गरबा केला तर त्याचा फायदा होणार नाही. अशा परिस्थितीत, ज्या दिवशी तुमचा मूड नसेल किंवा तुम्हाला आळशी वाटत असेल अशा दिवशी गरबा खेळू नका.

२) गरबा खेळताना नेहमी चांगले विचार मनात ठेवा. गरबा खेळताना काही लोक ग्रुपमधील कोणत्याही सदस्याशी भांडतात. अनेक वेळा याठिकाणी मारामारीही होते. अशा स्थितीत गरबा सुरू झाला की हे लोक मनातल्या मनात विशिष्ट व्यक्तीला अपश्ब्द लागतात. अशा कृत्यांमुळे गरबा करताना नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे गरबा खेळताना मनात कोणतेही वाईट विचार आणू नका.

३) गरबा खेळताना अनेक मुलं मुली फ्लर्टींग करतात. त्यावरून अनेकदा वादही होतात.  म्हणून गरबा खेळताना पूर्ण उत्साहानं खेळाकडे लक्ष द्या जेणेकरून देवीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहील. गरबा पाहत असलेल्यांनी सारखीच भावना मनात ठेवून सणांचा आनंद लुटायला हवा.

४) गरब्यासाठी जाताना जास्त बटबटीत, डार्क मेकअप करू नका. यामुळे  तुमचा लूक बिघडू शकतो. नाईट लाईट्सना साजेसा सिंपल मेकअप करून तुम्ही गरब्याचा आनंद घेऊ शकता. 

५) नवरात्रीत जर तुम्ही उपवास केला असेल तर गरब्याला जाताना उपवासाचं काहीतरी खाऊन जा. जास्तवेळ उपाशी राहून गरबा केल्यानं तुम्हाला डिडायड्रेशन, थकवा, अशक्तपणा, त्वचा निस्तेज दिसणं अशा समस्या जाणवू शकतात. म्हणून शक्यतो फळं किंवा ज्यूस घेऊन मग गरबा खेळायला जा.

Web Title: Navratri 2022 : Mistakes not to do during navratri garba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.