Join us  

नवरात्रीमध्ये कुंकूमार्चन करायचं? घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणारं शुद्ध कुंकू, डागही पडणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 4:41 PM

Navratri 2024: बाजारात मिळणारं रासायनिक, डाग पडणारं कुंकू वापरण्यापेक्षा ही सोपी पद्धत बघा आणि कुंकूमार्चन किंवा हळदी कुंकू कार्यक्रमासाठी घरच्याघरी अगदी शुद्ध कुंकू तयार करा...(how to make kunku at home?)

ठळक मुद्देबाजारात मिळणाऱ्या भेसळीच्या कुंकवापेक्षा हे कुंकू नक्कीच जास्त दिवस टिकेल.

नवरात्रीनिमित्त अनेक महिला कुंकूमार्चन, हळदी- कुंकू असे कार्यक्रम करत असतात. या दोन्ही कार्यक्रमांना भरपूर प्रमाणात कुंकू लागते. बाजारात जे कुंकू मिळते, त्यात हल्ली बऱ्याच प्रमाणात भेसळ केलेली असते. त्यामध्ये भडक लाल रंग मिसळलेला असतो. त्यामुळे ते कुंकू ओले करताच त्याचा डाग हातांना, कपड्यांना लागतो. म्हणूनच असे भेसळीचे कुंकू वापरण्यापेक्षा नवरात्रीमध्ये कुंकूमार्चन आणि हळदीकुंकू असे कार्यक्रम करण्यासाठी घरच्याघरी तयार केलेले शुद्ध कुंकू वापरून पाहा. कुंकू तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.(easy and simple recipe of making kunku at home?)

 

घरच्याघरी कुंकू कसे तयार करावे?

घरीच कुंकू तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मुख्य घटक जो लागणार आहे, तो म्हणजे हळद. हळदीपासून तयार होणारं कुंकू हे शुद्ध कुंकू मानलं जातं.

फक्त १५ मिनिटांत करा उपवासाची मऊसूत इडली, हवा फक्त भगर आणि बटाटा- घरातही सर्वांनाच आवडेल

कुंकू तयार करण्यासाठी एक वाटी हळदीसोबतच १ चमचा बेकिंग सोडा, एका लिंबाचा रस, १ चमचा शुद्ध तूप, १ चमचा गुलाबजल आणि थोडा कापूर लागणार आहे.

गळ्यात आधी तर एका भांड्यात हळद काढून घ्या. त्या हळदीमध्ये बेकिंग सोडा घाला आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्या. यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा सगळं मिश्रण १ ते २ मिनिटांसाठी व्यवस्थित हलवून घ्या.

 

आता कुंकू सुवासिक होण्यासाठी त्यामध्ये थोडं गुलाबाचं पाणी टाका. गुलाब पाण्यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही इसेंशियल ऑईलचे २ ते ३ थेंब टाकून ते मिसळलं तरी चालेल.

सलग ९ दिवसांच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याची भीती? ७ टिप्स- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही

किंवा गुलाबपाणी न वापरता साध्या पाण्यात इसेंशियल ऑईल मिसळून टाकले तरी चालेल. हे सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून चांगले मिसळून घ्या. 

काही वेळानंतर हे कुंकू साधारण ५ ते ६ तासांसाठी कडक उन्हात ठेवा. त्यानंतर ते एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. बाजारात मिळणाऱ्या भेसळीच्या कुंकवापेक्षा हे कुंकू नक्कीच जास्त दिवस टिकेल.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४किचन टिप्सहोम रेमेडी