पितृपक्ष संपून आता नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते (Navratri 2024). यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा. हा दिवा नऊ दिवस घरात तेवता असला पाहिजे. त्यामुळेच नवरात्रीच्या अखंड दिव्यासाठी वात तयार करताना काही गोष्टी आवर्जून करा (navratri akhand vaat diya), जेणेकरून नऊ दिवस तुमच्या घरातली अखंड वात देवासमोर छान तेवत राहील. (how to make akhand vaat for navratri in Marathi?)
अखंड वात तयार करताना कोणत्या चुका टाळाव्या?
१. कापसाची निवड
बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे कापूस येतात. या दिवसांमध्ये तर मेडिकेटेड कापूसही विकले जातात. असा कापूस अखंड दिव्याची वात तयार करण्यासाठी मुळीच वापरू नये. कारण तो चांगला जळत नाही.
नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत
त्याऐवजी एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा ज्यांच्या घरी घरचा कापूस आहे, त्यांच्याकडून थोडा कापूस आणून वात तयार करा. किंवा वातीसाठी कापूस घेताना तो चोखंदळपणे पाहून व्यवस्थित निवडून घ्या.
२. वातीची लांबी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच घटस्थापनेपासून लावलेला अखंड दिवा नऊ दिवस आपल्याला तेवत ठेवायचा असतो. त्यामुळे या दिव्यामध्ये नेहमीपेक्षा थोडी मोठी वाट लागते.
नवरात्री २०२४ : देवाच्या पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' खास वस्तू, देव दिसतील तेजपुंज
म्हणूनच अखंड दिव्यातली वात कधीही कमी लांबीची करू नका. अखंड दिव्यातली वात ही आपल्या तळहातापेक्षाही जास्त लांबीची असावी. एकसमान दोन वाती कराव्या. त्या एकमेकींमध्ये व्यवस्थित गुंफाव्या आणि मग दिव्यामध्ये घालाव्या. ही वात मोठी झाली तरी चालेल पण छोटी होता कामा नये.
३. वातीची जाडी
अखंड दिव्यातली वात न विझता नऊ दिवस अखंडपणे तेवत राहावी, यासाठी ती वात थोडीशी जाड असावी.
एका मिनिटांत किलोभर शेंगदाण्यांची टरफलं निघतील- बघा उपाय, काम होईल एकदम सोपं
अतिशय पातळ किंवा बारीक वात करून नका. ती लवकर विझण्याची शक्यता असते. तसेच खूप जाडीभरडी वातही करू नये. ती वात जास्त तेल पिते आणि त्या तुलनेत खूप कमी चालते.