Lokmat Sakhi >Social Viral > नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ४ गोष्टी, काम होईल झटपट-घर चकाचक

नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ४ गोष्टी, काम होईल झटपट-घर चकाचक

Navratri festival preparation home cleaning tips : कष्ट करताना स्मार्ट वर्क करायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 11:44 AM2024-09-27T11:44:07+5:302024-09-30T14:20:12+5:30

Navratri festival preparation home cleaning tips : कष्ट करताना स्मार्ट वर्क करायला हवे...

Navratri festival preparation home cleaning tips : Cleaning the house for Navratri? Remember 4 things, the job will be instant-home shiny | नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ४ गोष्टी, काम होईल झटपट-घर चकाचक

नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ४ गोष्टी, काम होईल झटपट-घर चकाचक

घरोघरी एव्हाना नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. घट बसवण्याआधी घराची साफसफाई करणे हे एक मोठे आणि अतिशय महत्त्वाचे काम महिला वर्गाला असते. सणवार म्हटलं की महिलांना नेहमीच खूप ताण येतो. एकीकडे रोजचे ऑफीस आणि घरकाम असतेच. त्यात उपवास, घट बसवून देवीची आरती आणि धार्मिक विधी, त्यात देवीला नैवेद्य, हळदीकुंकू, त्यात चांगले दिसण्यासाठी तयार होण्याची गडबड. आणि या सगळ्याआधी येते  ती म्हणजे घराची साफसफाई. घराची साफसफाई म्हणजे महिलांना फार टेन्शन येतं (Navratri festival preparation home cleaning tips). 

येणार-जाणार काय म्हणतील, सगळीकडे धूळ आणि जळमटं झाली आहेत. घरी देव येणार तर घर साफ असायला हवं. हे सगळं जरी खरं असलं तरी आपली तब्येत, घरातील परिस्थिती आणि मिळणारी मदत यांचा विचार करुनच ही साफसफाई व्हायला हवी. नाहीतर सणवार येतात आणि जातात पण त्यानंतर आपल्याला येणारे दुखणे मात्र बराच काळ आपल्या सोबत राहते. म्हणूनच ही साफसफाई करताना थोडे स्मार्ट काम केले तर प्रमाणाबाहेर थकायलाही होत नाही आणि घरही छान चकाचक होते. 

(Image : Google)
(Image : Google)

१. आधुनिक उपकरणांची मदत

सध्या बाजारात घर साफ करण्यासाठी बरीच आधुनिक उपकरणे मिळतात. ही उपकरणे आपल्या सोयीसाठीच असल्याने शक्य असल्यास अशी उपकरणे घरी आवर्जून आणून ठेवावीत. आणणे शक्य नसेल तर ज्यांच्याकडे ती असतील त्यांच्याकडून काही काळासाठी घ्यावीत. हल्ली अशाप्रकारची उपकरणे भाडे तत्त्वावर उपलब्ध असतात त्यांची माहिती घेऊन ती घ्यावीत आणि मग साफसफाई करावी. जेणेकरुन वेळ आणि कष्ट वाचतात. 

२. घरातील मंडळींची-मदतनिसांची मदत

आपल्या घरातले आपल्याला सगळे माहिती आहे, इतर लोक स्वच्छ काम करत नाहीत असा विचार अनेकदा महिला वर्गाकडून केला जातो. पण त्याचा ताण आपल्यावरच येत राहतो. मात्र असे न करता घरातील इतर मंडळी, मदतनीस यांची मदत घेऊन ही साफसफाई केली तर काम नक्कीच सोपे होते. हल्ली साफसफाई करुन देणाऱ्या एजन्सीही असतात, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या शक्य नसेल तर खरंच अशाप्रकारच्या एजन्सीची मदत घ्यायला हवी.

(Image : Google)
(Image : Google)

३. वेळ आणि रिसोर्सनुसार कामाची तडजोड

साफसफाई करायला काढली की एकातून एक निघतच जाते. मात्र खूप जास्त करत न बसता वरवरजे जे आवश्यक आहे तेवढेच एकावेळी काढावे. कारण नवरात्री म्हणून नेहमीची कामं, ऑफीस यांना सुट्टी नसते. त्यातही उपवास म्हटल्यावर थकवा येण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे स्वयंपाकघर, देवाची खोली, दर्शनी भाग इतकं साफ झालं तरी खूप आहे हे लक्षात घेऊन वेळेचे आणि कामाचे नियोजन करायला हवे. 

४. अपघात टाळा

अनेकदा पंख्यांची किंवा वरच्या बाजुला असलेल्या कॅबिनेटची साफसफाई करताना आपण स्टूल, खुर्ची, शिडी यांवर चढतो. घाईत काम करण्याच्या नादात लागण्याची, पडण्याची शक्यता असते. काहीवेळा हे जीवावर बेतणारेही ठरु शकते. त्यामुळे अशाप्रकारचे काम करताना शांतपणे योग्य ती काळजी घेऊन करायला हवे. साफसाफाईच्या सोप्या ट्रिक्स आणि उत्पादने वापरल्यासही नक्कीच फायदा होतो. 

Web Title: Navratri festival preparation home cleaning tips : Cleaning the house for Navratri? Remember 4 things, the job will be instant-home shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.