अभिनेत्री नीतू कपूर आणि अभिनेत्री आलिया भट ही बॉलीवूडमधील सासू- सुनेची एक सुपरहीट जोडी. नीतू कपूर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं आणि त्यांच्या सासुबाईंचं म्हणजेच कृष्णा कपूर यांचं खूप छान ट्युनिंग होतं. बऱ्याचदा तर ऋषी कपूर आणि नीतू यांचं भांडण झालं तर कृष्णा कपूर मुलाला डावलून नीतू यांची बाजू घ्यायच्या, असं नीतू यांनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे. आता जेव्हा याच नीतू कपूर सासूच्या भुमिकेत आहेत, तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या सुनेचं नातं कसं आहे, हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक उत्सूकतेचा विषय आहे. आलियाची सासू म्हणून त्यांनी अतिशय प्रगल्भ भूमिका घेतली असून त्यांच्याप्रमाणे इतर सासूबाईंनीही त्यांचे विचार बदलले तर आपल्याकडच्या सासू- सुनांचे वाद बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतील.(Neetu Kapoor Reveals Her Relationship With Alia Bhat)
कॉफी विथ करण कार्यक्रमात नीतू कपूर आल्या होत्या त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं नव्या नात्याचं गणित. करण जोहर नीतू कपूर यांना प्रश्न विचारतो की तुमच्या वैवाहिक आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी रणबीर कपूर आणि आलिया यांनी तुमच्याकडून शिकली पाहिजे..
कोणाला मिळाला बंगला तर कोणाला मिळाली गाडी- बघा मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे सेलिब्रिटी...
यावर नीतू कपूर यांनी नथिंग असं उत्तर दिलं आणि म्हणाल्या की हल्लीचा जमाना असा आहे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही राहा पण फक्त आनंदात राहा.. त्या म्हणाल्या की त्यांची पिढी आणि माझी पिढी वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांचे आयुष्य माझ्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्यामुळे मी ज्या अनुभवांमधून गेले किंवा मी ज्या गोष्टी केल्या, त्याच गोष्टी त्यांनीही कराव्या, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
आपल्याकडच्या बहुतांश घरांमधील सासूबाईंना वाटत असतं की येणाऱ्या सुनेने त्यांनी जसं केलं त्याप्रमाणेच घरातल्या सगळ्या गोष्टी चालू ठेवाव्या, त्यांच्या पावलांवर पाऊल टाकूनच संसार करावा.
पाठ- मान- कंबरदुखीने त्रस्त आहात? फक्त १ मिनिटासाठी 'हे' स्ट्रेचिंग करा, चटकन आराम मिळेल
प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घेऊन चालावं. पण हल्लीच्या सुनांना प्रत्येक गोष्टीत इतरांच्या सल्ल्याने चालणं मान्य नसतं. काही गोष्टी घरच्यांचा विचार घेऊन तर काही गोष्टी स्वत:च्या मनासारख्या करायच्या असतात. आणि तिथेच खरी वादाची सुरुवात व्हायला लागते. दोघींनी एकमेकींना समजून घेत सुवर्णमध्य काढला आणि हल्लीच्या सासुबाईंनी नीतू कपूर यांच्यासारखी भूमिका घेतली तर बऱ्याचा घरांमधले वाद कमी होतील नाही का?