९० च्या दशकातले बॉलीवूड सॉंग ‘मैने पायल है छनकाई...’ हे गाणे गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. याचे कारण म्हणजे या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन नुकतेच आले असल्याने हे गाणे ट्रेंडींगमध्ये आहे. १९९९ मध्ये फाल्गुनी पाठक हिने गायलेल्या अल्बममधील हे गाणे त्यावेळी बरेच गाजले होते. नेहा कक्कर आता या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन गायले असून लोक त्यावर रीमिक्स बनवताना दिसत आहेत. याच रिमिक्स गाण्यावर एक महिला अतिशय उत्साहाने डान्स करताना दिसत असून ज्याचा व्हिडिओ प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर हिने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे (Neha Kakkar Share Video of Dancing Women Goes Viral).
व्हिड़िओमध्ये एक महिला साडी नेसून या गाण्यावर अतिशय नमसोक्त डान्स करताना दिसते. वजनाने थोडी जास्त असूनही ती करत असलेल्या डान्स स्टेप्स खरंच कौतुकास्पद आहेत. घराच्या टेरेसवर ही महिला डान्स करत असून बाजूला एक लहानसे बाळही दिसते. हा व्हिडिओ नेहा कक्करने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने गायलेले ‘ओ सजना’ हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर बरीच चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला असून ४ हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी या डान्स करणाऱ्या महिलेचे आणि नेहा कक्करचे कौतुकही केले आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना नेहा कॅप्शनमध्ये लिहीते “आपल्याला खूप सारे प्रेम, अशाचप्रकारे आयुष्याचा आनंद घेत राहा.” लोकं आनंदी असतील तर मला खूप छान वाटते. विशेषत: या व्यक्ती आई असतील तर आणखीनच चांगले वाटते. याचे कारण म्हणजे आई कायम खूप कष्ट घेऊन सगळ्या गोष्टी करत असते. त्यांच्या आधारवड असलेल्या नवऱ्यांचेही कौतुक. देव त्यांचे भले करो.”