आपल्या समाजात सौंदर्याची व्याख्या म्हणजे सडपातळ बांधा, रंग गोरा, हाईट ५ ते ६ फुट अशी केली जाते. मुलींचा बांधा हा नेहमी सडपातळ असावा असे म्हटले जाते. पण जर ती अंगाने जरा जाड असली तर, तिच्यामागे वजन कमी करण्याचा तगादा लावण्यात येतो. वजन वाढलं की, 'किती जाड झालीस', 'जरा कमी खा', 'तेलकट कमी खाल्लीस की वजन कमी होईल', अशा प्रकारचे वाक्य नेहमी तिच्या कानी पडतात.
आपण पाहिलं असेल की, मिस युनिव्हर्सपासून (Miss Universe) ते अभिनेत्रींपर्यंत (Actress) प्रत्येक महिला ही झिरो फिगर असते. पण हेच झिरो फिगर, फिट अँड फाईनचा टॅग एका स्पर्धकाने मोडून काढला आहे, व या स्पर्धकाने मिस युनिव्हर्स नेपाळचा किताबही पटकावला आहे. प्लस साईज मिस युनिव्हर्स नक्की आहे तरी कोण? तिची चर्चा एवढी सोशल मीडियात का होत आहे? पाहूयात(Nepal’s Jane Garrett defies stereotypes as first plus-sized woman to compete in Miss Universe).
प्लस साईज मिस युनिव्हर्स नक्की आहे तरी कोण?
जेन दीपिका गेरेट ही मिस युनिव्हर्स नेपाळ स्पर्धेतली पहिली प्लस साईज मॉडेल ठरली. जेनचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आणि खडतर होता. ती मुळची नेपाळची असून, तिच्या या कॉण्फिडेंसचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. एकेकाळी आत्महत्या करायला निघालेल्या जेनने, आज थेट मिस युनिव्हर्सच्या यादीत आपलं नाव कोरलं.
फ्रिज साफ करण्यात खूप वेळ जातो, ४ टिप्स - सफाईचे काम होईल झटपट, फ्रिज दिसेल एकदम नव्यासारखा
म्हणून जेन आत्महत्या करणार होती..
आज मिस युनिव्हर्स स्पर्धेतील प्लस साईज मॉडेल म्हणून दीपिकाची ओळख निर्माण झाली आहे. ती एक नर्स आणि बिझनेस डेव्हलपर देखील आहे. मात्र, वर्षभरापूर्वी ती आपल्या वाढत्या वजनामुळे आत्महत्या करायला जाणार होती. तिचं वाढतं वजन अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे नसून, हार्मोनल समस्यांमुळे वाढलं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि पीसीओएसबाबतीत जागरूकता पसरवण्याचं कार्य ती करते. शिवाय याच गोष्टीचा वापर करत दीपिकाने जगाला तिची दखल घ्यायला भाग पाडलं.
मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?
रॅम्प वॉक करत पाडली आपली वेगळी छाप
मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली प्लस साइज मॉडेल आहे. जेनने प्रिलिमनेरी कॉम्पिटिशन राउंडमध्ये रॅम्प वॉक करत, आपली हटके झलक सादर केली. दीपिकाचं व्यक्तिमत्व पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. रॅम्प वॉक करताना तिने निरोगी आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश दिला. तिचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.