बॉलीवूड अभिनेत्री काजोल आपले स्टेटमेंट्स आणि हटके स्टाईल्समुळे नेहमीच चर्चेत असते. रविवारी मुंबई विमानतळावर काजोल तिच्या चालण्याच्या शैलीमुळे ट्रेल झाली. सनग्लासेससह संपूर्ण चेहऱ्यावर मास्क लावून काजोल भरभर पाऊलं उचलत चालत होती. यावेळा काजोलनं गोल्डन, पिवळ्या रंगाचा स्कार्फ आपल्या अंगाभोवती गुंडाळला होता. (Netizens call Kajol ‘Rajdhani Express)
काजोलचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले, 'राजधानी एक्सप्रेस'. तर दुसऱ्याने 'वॉशरूम जाना होगा' अशी कमेंट केली. 'घर साफ करने की टेंशन मे भाग रही होगी', अशा शब्दात नेटिझन्सनी विनोदी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ऐतिहासिक ब्लॉकबस्टर "तान्हाजी: द अनसंग वॉरियर" मध्ये काजोल मोठ्या पडद्यावर शेवटचे दिसली होती.
४७ व्या वर्षीही सुंदर दिसणाऱ्या काजोलच्या सौदर्याचं सिक्रेट काय?
काजोल सांगते की तुमच्या चेहऱ्यावर वय वाढल्याची चिन्हे दिसू द्यायची नसतील तर दररोज ८ ग्लास पाणी प्यायलाच हवं. एवढं पाणी आपल्या पोटात जाईल, याकडे काजोलचं कटाक्षाने लक्ष असतं.
आरोग्यासोबतच त्वचा चांगली ठेवायची असेल तर ८ ते १० तासांची रात्रीची झोप दररोज घ्यायलाच हवी. योग्य झोप मिळाल्याने शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच चेहऱ्यावर दिसून येतो.
वरात आलेली पाहून नवरी भलतीच खूश झाली; खिडकीत उभं राहूनच नाचू लागली; पाहा व्हिडीओ
रात्री झोपण्यापुर्वी काजोल चेहरा आठवणीनं धुते. या बाबतीत कोणतीही हयगय करत नाही. चेहरा व्यवस्थित आणि खूपच काळजीपुर्वक धुते. त्यानंतर तो स्वच्छ कोरडा करून त्यावर नाईट क्रिम अवश्य लावते त्यानंतरच झोपते.
तिच्या म्हणण्यानुसार तुम्ही रोज किती आणि कसं वर्कआऊट करता आणि काय खाता याला खूप जास्त महत्त्व आहे. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तर तुमची त्वचा तरूण आणि टवटवीत राहते. तसेच योग्य डाएटमुळे तुमचं शरीर आणि मन निरोगी राहतं. याचाच परिणाम त्वचेवरही सकारात्मक पद्धतीने दिसून येतो.