Join us  

सायकलची किंमत ऐकूनच गडबडले नेटिझन्स, म्हणाले एवढ्या पैशात तर आम्ही अख्खं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 6:22 PM

Viral Video of Bicycle: सायकल चालविणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे त्या सायकलची किंमत..

ठळक मुद्देसायकलची किंमत ऐकूनच अनेकांची भांबेरी उडाली आहे. या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, तेच या महागड्या सायकलची महती जाणू शकतात, एवढं मात्र खरं.

सायकल ही पुर्वी गरिबांचं वाहन म्हणून ओळखली जायची. पेट्रोलचा अजिबातच खर्च नाही. नियमितपणे ऑईलिंग केलं आणि दर आठवड्याला ५- १० रुपयांची हवा भरली की सायकलची सवारी अगदी कुठेही धुम ठोकत जायला तयार असते. आजही काही अंशी सायकलची ओळख तशीच आहे. पण एकानंतर एक स्पोर्ट्स सायकलचे नवनवे महागडे  प्रकार येत गेले आणि त्यानंतर मात्र सायकलला लागलेला गरिबीचा टॅग निघून गेला. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधली (Viral Video of Bicycle) सायकलही त्याच प्रकारातली आहे. (Must see this cycle costs Rs. 8.5 Lacks)

fatbikervaibhav या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी सायकल चालवताना दिसते आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने तिची एक छोटेखानी मुलाखतच घेतली आहे.

त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

यामध्ये तो या तरुणीला तिच्या सायकलची कंपनी आणि सायकलची किंमत विचारतो. त्यावर ती सायकलची किंमत तब्बल साडेआठ लाख रुपये असल्याचं सांगते. सायकलची किंमत ऐकूनच अनेकांची भांबेरी उडाली आहे. ८. ५ लाख रुपये किंमत असलेल्या या सायकलमध्ये एवढी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, हे सर्वसामान्यांना लक्षात येत नाही. पण या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, तेच या महागड्या सायकलची महती जाणू शकतात, एवढं मात्र खरं.

 

या व्हिडिओला मिळालेल्या कमेंट्सही खूपच मजेशीर आहेत. काही जणांनी म्हटलंय की लाखो रुपयांची सायकल घेण्यापेक्षा त्यात एक मस्त चारचाकी गाडी येते..

शेंगदाण्याचं- खोबऱ्याचं-तीळाचं-बदामाचं तेल नक्की कशासाठी वापरायचं? चुकीचा वापर आणतो गोत्यात..

तर कुणी म्हटलंय की या सायकलच्या किंमतीमध्ये तर मी सायकलचं अख्ख दुकानच उघडू शकतो. एवढ्या किंमतीत गरिबांचं वन रुम किचन येईल, असंही एका जणाने म्हटलं आहे. एकंदरीतच काय की सायकल आणि तिची किंमत यांची रंगतदार चर्चा सध्या सोशल मिडियावर गाजतेय.

 

टॅग्स :सोशल व्हायरलसायकलिंग