Lokmat Sakhi >Social Viral > मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

मलायकाचा दिवाळी लूक सध्या जबरदस्त ट्रोल होत आहे. यावेळी ट्रोल होण्यासाठी मलायकाची पर्स निमित्त ठरली असून तिच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी पार कचरा करून टाकला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 01:34 PM2021-11-09T13:34:21+5:302021-11-09T13:35:28+5:30

मलायकाचा दिवाळी लूक सध्या जबरदस्त ट्रोल होत आहे. यावेळी ट्रोल होण्यासाठी मलायकाची पर्स निमित्त ठरली असून तिच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी पार कचरा करून टाकला आहे.

Netizens troll Malaika's designer purse, saying it is a purse or a broom? | मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

Highlightsमलायकाच्या लूकपेक्षा यंदाच्या दिवाळीत तिची केरसुणी पर्सच जास्त भाव खाऊन गेली असं दिसतंय....

मलायका कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायमच चर्चेत राहत असते. तिची इतकी चर्चा असते की महिन्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती हमखास ट्रोल होतेच. कोविड लस घ्यायला ती जीमवेअर घालून गेली म्हणून कधी चर्चा होते, तर कधी तिचं चालणं, तिचं हसणं नेटीझन्सकडून ट्रोल होतं. एवढंच काय अगदी तिचे केस देखील तिला ट्रोल करण्यासाठी पुरेसे ठरतात. यावेळी पण असंच काहीसं झालं आहे आणि पुन्हा एकदा मलायका जबरदस्त ट्रोल होत आहे.

 

अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोराने देखील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिची साडी, तिचा मेकअप, तिचे दागिने, हेअरस्टाईल असं सगळं परफेक्ट आहे. पण तिच्या पर्सने मात्र या सगळ्या परफेक्ट गोष्टींची वाट लावून टाकली आहे. तिची पर्स नेटीझन्सला चक्क झाडूसारखी वाटते आहे. दिवाळीच्या दिवसात अनेक घरांमध्ये केरसुणीची पूजा केली जाते. काही ठिकाणी याला फडा देखील म्हणतात. मलायकाची पर्स नेटिझन्सला या फड्याप्रमाणे वाटते आहे. 

 

म्हणूनच तर 'मलायका काकू केरसुणी घेऊन उभी आहे की काय.... 'असे मिम्स तिच्यावर येऊन ती चांगलीच ट्रोल होत आहे. या फोटोमध्ये मलायकाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. प्लेन सिल्क साडी आणि सिल्वर बॉर्डर असा या साडीचा लूक आहे. गुलाबी साडी आणि हिरवं स्ट्रीप ब्लाऊज असं तिने घातलं असून केसांचा उंच अंबाडा घातला आहे. अंबाड्याला गोलाकार गजराही माळला आहे. एकंदरीतच मलायकाचा हा लूकही नेटीझन्सला फार आवडलेला नाही. 'अगं बाई आता बसं झालं ना किती नटशील....', 'जरा दुसऱ्यांना तरी चान्स मिळू दे की....' अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या या फोटोवर येत आहेत.

 

मलायकाच्या पर्सची खासियत
मलायकाची जी पर्स ट्रोल होत आहे, ती अजिबातच साधीसुधी नाही. प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी ही पर्स डिझाईन केली असून हजारोंच्या घरात या पर्सची किंमत आहे. ही पर्स एका बटव्यासारखी असून पर्सच्या खाली सोनेरी, चंदेरी रंगाच्या लांबचलांब लेस आहेत. ही लेस एवढी लांब आहे की ती चक्क मलायकाच्या तळपायापर्यंत आली आहे. त्यामुळेच दुरून पाहिली तर ती पर्स एखाद्या केरसुणीसारखी वाटते आहे.

 

मलायकासोबत होता अर्जून कपूर
मलायकाने हा लूक खास दिवाळीसाठी केला हाेता. असा मस्त मेकअप करून आणि हातात पर्स घेऊन मलायका दिवाळी सेलिब्रेट करायला अर्जून कपूरच्या घरी गेली होती. अर्जून कपूर सोबतच संपूर्ण कपूर कुटूंबासोबत मलायकाने यंदाची दिवाळी साजरी केली. मलायका दारात येताच तिला रिसिव्ह करायला अर्जून कपूर गेटजवळ आला होता. त्यावेळी तो देखील पुर्णपणे ट्रॅडिशनल लूकमध्ये होता. काळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता आणि हातात मोठे डायल असणारी मेटल रिस्टवॉच असा अर्जूनचा लूकदेखील अतिशय डॅशिंग वाटत होता. पण त्याच्या किंवा मलायकाच्या लूकपेक्षा यंदाच्या दिवाळीत तिची केरसुणी पर्सच जास्त भाव खाऊन गेली असं दिसतंय....

 

Web Title: Netizens troll Malaika's designer purse, saying it is a purse or a broom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.