तुमच्या स्वत:च्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की अभ्यास तर खूप चांगला केलेला असतो. विषयांचं पाठांतरही अगदी उत्तम झालेलं असतं. एवढंच नाही तर प्रश्नपत्रिकेतही आपण ज्यांचा सराव केलेला असतो, तेच प्रश्न येतात. पण तरीही पेपर चांगला जाऊनही आपल्याला परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाहीत. असं झालं की नेमकं काय चुकलं होतं, एवढे कमी गुण कसे आले तेच कळत नाही. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही अभ्यासकांनी शोधून काढलं आहे. परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण येण्याचं जे काही कारण त्यांनी शोधून काढलं आहे, त्याचा विचारही आपण कधी केला नसेल. (new study reveals students score low in exams if exam room ceilings are too high and room size is too large)
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया आणि डिकीन युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे नुकताच एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की ज्या हॉलचं छत खूप उंचावर असतं, तसेच जो हॉल खूप मोठा असतो, त्या हॉलमध्ये बसून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळतात.
अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...
यासाठी त्यांनी जवळपास १५, ४०० विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठांमधून पदवीचं शिक्षण घेणारे होते. मुलांचं शिक्षण, लिंग, वय, शैक्षणिक पात्रता असे निष्कर्ष काढून त्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली होती. (new study reveals students score low in exams if exam room ceilings are too high and room size is too large)
या मुलांना वेगवेगळ्या हॉलमध्ये बसवून परीक्षा द्यायला लावली असता असं लक्षात आलं की जे विद्यार्थी तुलनेले उंच छत असणाऱ्या मोठ्या हॉलमध्ये बसून परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांना मन एकाग्र करताना अनेक अडचणी येतात.
तुम्ही ज्याला 'सुपरफूड' म्हणता तेच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं! वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
तसेच एवढ्या मोठ्या हॉलमध्ये गेल्यावर त्यांची एन्झायटी वाढते. त्यामुळेही मन एकाग्र करण्यासाठी, वाचलेलं सगळं व्यवस्थित आठवून लिहिण्यासाठी त्यांना कठीण जातं. याचाच परिणाम त्यांच्या गुणांवर दिसून येतो आणि परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण दिसून येतात, असा निष्कर्ष संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून मांडला आहे.