Lokmat Sakhi >Social Viral > थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

New Year Eve Party Ideas - for your Home New Year 2024 : कोण म्हणतं घरीच थर्टी फस्टची पार्टी करणं बोअर असतं? या घ्या पार्टी आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 02:05 PM2023-12-22T14:05:17+5:302023-12-22T14:06:17+5:30

New Year Eve Party Ideas - for your Home New Year 2024 : कोण म्हणतं घरीच थर्टी फस्टची पार्टी करणं बोअर असतं? या घ्या पार्टी आयडिया

New Year Eve Party Ideas - for your Home New Year 2024 | थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

२०२३ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. विविध गोष्टी करून सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी लोकं सज्ज होतील. नव्या वर्षाचे स्वागत करताना प्रत्येक जण नवीन संकल्पना आखतो. शिवाय हे नवे संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याच्या तयारीला लागतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही लोकं क्लब किंवा पार्टीला जाऊन धम्माल मस्ती करतात (New Year Celebration Ideas). तर काही जण घरीच आपल्या मित्र-परिवारासह इनडोअर गेम्स खेळत नवीन वर्षाचे स्वागत करतात.

जर आपण देखील मित्र-परिवारासह घरीच नवीन वर्षाचं स्वागत करणार असला तर, या काही गोष्टी करून आपण सेलिब्रेट करू शकता. यासाठी आपल्याला घराबाहेर जाण्याची काहीही गरज नाही, घरात या ६ गोष्टी करून फुल टू धम्माल मस्ती करू शकता(New Year Eve Party Ideas - for your Home New Year 2024).

गेम नाईट

फक्त पार्टी केल्यानेच आपलं एन्जॉयमेंट होते असे नाही, आपण काही मजेशीर गेम्स खेळूनही नव्या वर्षाचं स्वागत करू शकता. घरीच मित्र-परिवारासह गेम नाईटचं आयोजन करा. वयाने मोठे झाल्यानंतर आपण जणू गेम्स खेळणं विसरूनचं गेलो आहोत. त्यामुळे जर आपण घरीच पार्टी करणार असाल तर, विविध गेम्स खेळून धम्माल करू शकता. आपण बॉर्ड गेम्स किंवा इतर व्हिडिओ गेम्सही खेळू शकता.

केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

मेमरी वॉल तयार करा

सरत्या वर्षाला निरोप देताना आपण या वर्षी काय नवीन ट्राय करून पाहिलं, आपल्या अचिव्हमेण्ट्स, यासगळ्या गोष्टींची फोटो फ्रेम तयार करा,  व हे फ्रेम्स लिविंग रूमच्या भिंतीवर लटकवा.

कुकिंग

सरत्या वर्षाला निरोप देताना बरेच जण हॉटेलमध्ये जाऊन आवडते पदार्थ खातात. काही जण मित्र-परिवारासह डिनर करण्यासाठी हॉटेलला जातात. पण आपण घरीच आवडणारे पदार्थांची लिस्ट काढून घरीच चमचमीत पदार्थ तयार करून खाऊ शकता. ज्यांना कुकिंग करायला आवडते, त्यांनी जरूर ३१ डिसेंबरला नवनवीन पदार्थ तयार करून खावे.

मुव्ही नाईट

अनेक जण सरत्या वर्षाला निरोप मनोरंजनाने करतात. काही जण मुव्ही पाहतात, किंवा नाटकाला जाऊन मनोरंजनाचा आनंद लुटतात. जर आपण देखील घरातून नव्या वर्षाचं आगमन करत असाल तर, मुव्ही किंवा अवॉर्ड शो पाहा. शिवाय आपण वेब सिरीज देखील पाहू शकता.

एड्स डे निमित्त फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, एक्स्पायर्ड कंडोमपासून तयार केला ड्रेस; नेटकरी म्हणाले..

डान्स पार्टी

डान्स पार्टी फक्त क्लबमध्ये होत नसून, आपण घरी देखील डान्स पार्टीचं आयोजन करू शकता. आपल्या मित्र-परिवारांना बोलावून त्यांच्या आवडीच्या गाण्यावर डान्स करू शकता. काहींना डान्स करण्याची प्रचंड आवड असते, त्यांना आपण डान्स सादर करण्यास सांगून घरातील आयोजित कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता.

ट्रुथ ओर डेयर

अनेकांना ट्रुथ ओर डेयर गेम खेळायला फार आवडते. कारण यात आपण समोरच्या व्यक्तीला टास्क देतो. हा गेम खेळताना आपल्याला फार काही वस्तूंची गरज लागत नाही. काही लोकांच्या उपस्थितीत हा गेम खेळला जाऊ शकतो.

Web Title: New Year Eve Party Ideas - for your Home New Year 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.