Join us  

बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा निवडली हँडलूम सिल्क साडी; काय तिची खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 1:59 PM

Nirmala Sitharaman's budget saree: यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेली हॅण्डलूम सिल्क साडीही चर्चेचा विषय ठरली आहे.. 

ठळक मुद्देयावर्षी बजेट सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी जी साडी नेसली होती ती हॅण्डलूम सिल्क प्रकारातली होती. तपकिरी आणि मरून रंगाची.

दरवर्षी अर्थसंकल्पाची जेवढी चर्चा होत असते, तेवढीच चर्चा निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman's budget saree) यांनी त्या दिवशी नेसलेल्या साडीचीही होत असते.. त्यांच्या साडीचा प्रकार कोणता, साडीचे काठ आणि पदर कसा आहे, साडीवरची नक्षी ाअणि तिचा रंग, यासगळ्या बाबत खूप जणांच्या मनात उत्सूकता असते.. त्यात महिला आघाडीवर आहेत, हे वेगळे सांगायला नकोच.... त्यामुळेच यावर्षी त्यांनी नेसलेल्या साडीचा प्रकार जाणून घेण्यासाठीही अनेक जण उत्सूक आहेतच.. म्हणूनच तर ही घ्या त्यांच्या साडीची संपूर्ण माहिती. 

 

यावर्षी बजेट सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी जी साडी नेसली होती ती हॅण्डलूम सिल्क प्रकारातली होती. तपकिरी आणि मरून रंगाची. चमकदार तपकिरी रंगाच्या साडीला मरून किंवा डार्क चॉकलेटी म्हणता येईल, अशा रंगाचे काठ होते. त्यामुळे त्यांनी घातलेलं ब्लाऊजही मरून रंगाचंच होतं.. साडीचा पदर तर भरजरी आहेच, पण साडीच्या आतल्या भागातही बऱ्यापैकी जर आहे, हे या फोटोंमधून दिसून येते..

 

हॅण्डलूम सिल्क साडीची खासियत हॅण्डलूम सिल्क साडी ही १०० टक्के सिल्कच्या धाग्यांपासूनच तयार झालेली असते... ही कला मुळची भारत आणि बांग्लादेशची आहे, असं मानलं जातं. दोऱ्या, लाकडी तुळया आणि खांब यांची विशिष्ट रचना करून हॅण्डलूम सिल्क साडी विणल्या जातात. एक साडी विणण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो. भारताच्या विविध भागांमध्ये आता हॅण्डलूम सिल्क साड्या विणल्या जातात. त्यामुळे त्या- त्या प्रांतानुसार साडीच्या आणि काठाच्या नक्षीमध्ये फरक दिसू लागतो. कांजीवरम, बनारसी, संबळपुरी, चंदेरी, मुगा, माहेश्वरी हे काही हॅण्डलूम सिल्क साड्याचे प्रकार आहेत. यापैकी निर्मला सीतारामण यांनी नेसलेली साडी संबळपुरी हॅण्डलूम सिल्क या प्रकारातली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबळपुरी साडी ही ओरिसाची. या साडीचे काठ आणि निर्मला सीतारामण यांच्या साडीचे काठ बऱ्यापैकी सारखे असल्याचे भासते. 

 

झपाट्याने झालेल्या औद्याेगिकीकरणामुळे हातमाग उद्योग मागे पडत चालला आहे.. त्यामुळे ही कला आणि ती जपणारे कलाकार यांना नवी उमेद देण्यासाठी सध्या  हातमाग उद्योगाला चालना देण्याचे विविध उपक्रम  राबविण्यात येत आहेत.. ही साडी नेसून निर्मला सीतारामण यांनीही या उद्योगाला पुन्हा प्रकाश झोतात आणले आहे, अशी चर्चा आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनिर्मला सीतारामननिर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2022संबलपुर