Lokmat Sakhi >Social Viral > अनंत- राधिकाच्या लग्नात नीता अंबानींच्या हातात रमन दिवा! लेकाला दृष्ट लागू नये म्हणून..

अनंत- राधिकाच्या लग्नात नीता अंबानींच्या हातात रमन दिवा! लेकाला दृष्ट लागू नये म्हणून..

What Is Raman Diya?: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुचर्चित विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. त्या सोहळ्यातल्या रमण दिव्याविषयी बघा ही काही खास माहिती ... (Nita Ambani Carries Raman Diya At Anant Ambani Radhika Merchant's wedding)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 12:06 PM2024-07-13T12:06:11+5:302024-07-13T16:04:39+5:30

What Is Raman Diya?: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुचर्चित विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. त्या सोहळ्यातल्या रमण दिव्याविषयी बघा ही काही खास माहिती ... (Nita Ambani Carries Raman Diya At Anant Ambani Radhika Merchant's wedding)

nita ambani carries raman diya at anant ambani radhika merchant's wedding, what is raman diya? gujarati tradition of raman diya | अनंत- राधिकाच्या लग्नात नीता अंबानींच्या हातात रमन दिवा! लेकाला दृष्ट लागू नये म्हणून..

अनंत- राधिकाच्या लग्नात नीता अंबानींच्या हातात रमन दिवा! लेकाला दृष्ट लागू नये म्हणून..

Highlights रमन दिवा किंवा गुजरातीमध्ये सांगायचं झालं तर रमन दिवो.. दिव्याचा हा कोणता प्रकार आणि तो नीता अंबानी यांच्या हातातच का दिसला बरं?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा म्हणजे अनंत अंबानी. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह नुकताच पार पडला (Anant Ambani- Radhika Merchant's wedding). त्या विवाह सोहळ्याची चर्चा अख्ख्या भारतातच काय पण जगभरात होत होती. देशोदेशीचे मान्यवर सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी आलेले होते. त्यामुळे या सोहळ्यातल्या अनेक गोष्टी खूपच लक्षवेधी ठरल्या. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे लग्नाच्याप्रसंगीनीता अंबानी यांच्या हातात (Nita Ambani Carries Raman Diya) दिसलेला रमन दिवा किंवा गुजरातीमध्ये सांगायचं झालं तर रमन दिवो (What Is Raman Diya?).... दिव्याचा हा कोणता प्रकार आणि तो नीता अंबानी यांच्या हातातच का दिसला बरं? (gujarati tradition of raman diya)

 

लग्न समारंभ म्हटलं की आपल्याकडे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले जातात. प्रत्येक संस्कृतीनुसार वेगवेगळ्या परंपरा असतात. अशीच रमन दिव्याची परंपरा गुजराती संस्कृतीमध्ये दिसून येते.

श्लोका अंबानीच्या गळ्यात चमकणारा 'तो' अस्सल खानदानी दागिना नेमका कोणाचा? बघा त्याची किंमत...

नवरदेव जेव्हा लग्नासाठी जात असतो, तेव्हा त्याची आई हा रमन दिवा घेऊन त्याच्यासोबत उभी असते. महाराष्ट्रात नवरदेव आणि नवरी हे दोघे जेव्हा लग्नासाठी घरातून निघतात किंवा लग्नासाठी बोहल्यावर उभे असतात, तेव्हा त्यांची करवली म्हणजेच बहिण हातव्याचे दिवे घेऊन त्यांच्या मागे उभी असते. ही रमन दिव्याची गुजराती परंपरा थोडीशी त्याच पद्धतीची. पण त्यांचा हा दिवा  हातव्याच्या दिव्यांपेक्षा खूप वेगळा असतो.

 

आपल्याकडचे दिवे कणकेपासून तयार झालेले असतात. तर रमण दिव्यांमध्ये गणपतीची प्रतिमा ठेवलेली असते. त्याच्या एका बाजुला स्वस्तिक असतं आणि गणपतीसमोर एक दिवा लावलेला असतो.

वाढदिवसाचा केक चेहऱ्याला फासता, फेकून मारता? २ गोष्टी चुकूनही करु नका, आयुष्यभर पस्तावाल कारण..

हा दिवा नवरदेवाला सुरक्षित ठेवताे आणि संकटांपासून, वाईट नजरेपासून त्याचा बचाव करतो, असं मानलं जातं. म्हणूनच अनंतच्या लग्नात वरमाय नीता अंबानी यांच्या हातातही तो रमन दिवा दिसून आला. 

 

Web Title: nita ambani carries raman diya at anant ambani radhika merchant's wedding, what is raman diya? gujarati tradition of raman diya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.