अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. हल्लीच त्यांच्या लग्नाचा प्री - वेडिंग सोहळा पार पडला. त्यांच्या प्री - वेडिंग सोहळ्याची चर्चा सोशल मिडीयावर फारच रंगली. याच लग्न सोहळ्याच्या निमित्ताने रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी वाराणसीत पोहोचल्या आहेत. मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची पत्रिका देवापुढे ठेवण्यासाठी त्या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका त्यांनी देवाच्या चरणी अर्पण केली. यानंतर नीता अंबानी (Nita Ambani) गंगा आरतीसाठीही गेल्या, पूजापाठ देवदर्शन झाल्यावर नीता अंबानी यांनी वाराणसीतील फेमस चाट खाण्याचा मनमुराद आनंद लुटला. शक्यतो चटपटीत चाट खाण्याच्या मोह आजवर कुणालाही आवरता आलेला नाही. चटपटीत, मसालेदार, आंबट - गोड चाट समोर येताच ते आपण कधी खातो असे आपल्याला होते. खुद्द नीता अंबानी चाट खातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. पाहूयात नेमकं काय आहे या व्हिडिओत(Video of Nita Ambani enjoying chaat at a local shop in Varanasi goes viral).
गंगा आरतीनंतर नीता अंबानी काशी चाट भंडारमध्ये (Nita Ambani visits chaat shop in Varanasi) गेल्या आणि त्यांनी इकडे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. ‘दर्शन घेतल्यानंतर मला खूप धन्य वाटत आहे. हिंदू धर्मात सगळ्यात आधी देवाचा आशिर्वाद घेतला जातो. मी माझा मुलगा अनंत आणि राधिकाच्या लग्नाची (Nita Ambani enjoys street food at a chaat shop in Varanasi) पत्रिका देवाच्या चरणी अर्पित करण्यासाठी आले आहे. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे’, असं नीता अंबानी म्हणाल्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला लग्न होणार आहे. रिलायन्स जिओ सेंटरमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे.
चाट खाण्याचा आनंद घेतला...
अनंत राधिकाच्या लग्नाची पत्रिका देवाच्या चरणी ठेवल्यानंतर, त्यांची पाऊले वाराणसीमधील प्रसिद्ध असलेल्या काशी चाट भंडारकडे वळली. यावेळी नीता अंबानी यांनी टमाटर चाट आणि आलू टिक्कीचा आस्वाद घेतला.
Varanasi, Uttar Pradesh: Nita Ambani visits a chaat shop and interacts with locals
— POWER CORRIDORS (@power_corridors) June 24, 2024
🎥ANI#NeetaAmbani#AnantAmbaniWedding#Varanasi#PanchayatiTimespic.twitter.com/QnusTmBkFp
वाराणसीत नीता अंबानी आल्यावर म्हणाल्या...
‘मी वाराणसीत १० वर्षांनंतर आले. इथला विकास आणि बदल पाहून मला खूप आनंद झाला आहे. काशी विश्वनाथ कॉरीडोअर, नमो घाट, सोलार एनर्जी आणि इथली स्वच्छता हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी इथल्या काशी विश्वनाथ मंदिरात १० वर्षांनंतर आले असले तरी इथल्या कारागिरांसोबत आमचा कामाच्या निमित्ताने संबंध येतोच. गंगा आरतीनंतर त्यांनी तिथल्या स्थानिक कारागिरांची भेट घेतली. रिलायन्स फाऊंडेशन आणि स्वदेशच्या माध्यमातून त्यांना जागतिक ओळख देऊ इच्छितो’, असं नीता अंबानी यांनी सांगितलं.