Join us  

नीता अंबानीच्या मेहंदी आर्टिस्टच्या मेहंदीकलेचे पॅरिस ऑलिंपिकमध्ये कौतुक, ऑलिंपिक रंगात ' अशी ' रंगली मेहेंदी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 5:58 PM

Nita Ambani’s mehendi artist applies Olympic-themed henna to fans in Paris : ऑलिंपिक पर्यंत पोहचली भारतीय मेहेंदीची कला

सध्या सर्वत्र ऑलिम्पिकचा माहौल रंगला आहे. प्रत्येक भारतीय ऑलिम्पियनचे कौतुक करत असताना, सध्या वीणा नागदाच्या कलेचं कौतुक होत आहे (Veena Nagda). वीणा नागदाच्या सुंदर मेहेंदी कलेला इंडिया हाऊसमध्ये मानाचे स्थान मिळाले असून, इंडिया हाऊसला भेट देणाऱ्या चाहत्यांनी यावेळी ऑलिम्पिक थीम मेहेंदीही लावली आहे (Olympic).

सध्या या कलेचं कौतुक होत असून, त्यांच्या सुंदर - रेखीव मेहेंदीचं कौतुक सोशल मीडियात होत आहे(Nita Ambani’s mehendi artist applies Olympic-themed henna to fans in Paris).

वाढलेलं वजन काही केल्या कमी होत नाही? पिटुकल्या मेथी दाण्यांचे 'करा' ३ सोपे उपाय; वजन घटणारच..

इंडिया हाउसमध्ये वीणा यांच्या मेहेंदीचं कौतुक

इंडिया हाउस हा एक उपक्रम आहे. जो नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या देखरेखीखाली राबवला जातो. त्यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा

वीणा नागदा यांनी ऑलिम्पिक चाहत्यांच्या हातावर सुंदर मेहेंदी काढली आहे. तिच्या डिझाईन्समध्ये सामान्यत: पाच इंटरलॉक केलेल्या रिंग्स पाहायला मिळतात. जे ऑलिम्पिकचे चिन्ह आहे. त्यांनी आपल्या कलेचे फोटो सोशल मीडियातही शेअर केले आहेत. आणि आपल्या कलेला व्यासपीठ दिल्याबद्दल वीणाने नीता अंबानी यांचे आभार मानले.

टॅग्स :पॅरिस ऑलिम्पिक २०२४नीता अंबानीसोशल व्हायरल