नवरी जेव्हा लग्नमंडपात जाण्यासाठी तिच्या घरातून निघते तेव्हा साधारणपणे आपल्याकडे असं वातावरण असतं की तिचे आई- वडील, नातलग, मित्रमंडळी असे सगळे तिच्या अवतीभोवती जमलेले असतात. वातावरण बऱ्यापैकी भावूक झालेलं असतं.... नवरी कधी लाजत असते तर कधी हसत असते.... मग एखाद्या सजवलेल्या गाडीत बसून ती लग्न मंडपात जाते.. असं सगळं बघण्याची आपल्याला सवय असते... पण इथे मात्र वेगळंच घडलं आहे..
एका भन्नाट नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) चांगलाच गाजतो आहे. Wedding Planning_witty Wedding या इन्स्टाग्रामच्या (instagram) पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटकरी मंडळी हा व्हिडिओ पाहून चांगलेच चक्रावले आहेत... काही जणांना या नवरीचं भलतंच कौतूक वाटलं आहे, तर काही जणांना तिचा स्वॅग अजिबातच आवडलेला नाही... त्यामुळे अशी कशी ही नवरी असा प्रश्नही तिला काही नेटकरी विचारत आहेत.
या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की एक तरूणी नवरीच्या वेशभुषेत आहे. केशरी रंगाचा लेहेंगा तिने घातला आहे. अशा नवरीच्या वेशातली ही तरूणी बुलेटवर मोठ्या ऐटीत स्वार झाली आहे आणि बुलेट चालवत ती तिच्या लग्नासाठी निघाली आहे. आजकाल नवरा- नवरीची लग्नमंडपातली एन्ट्री हटके असावी असा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो.. तसाच प्रयत्न या नवरीचाही असावा, असं हा व्हिडिओ पाहून वाटत आहे. ''When your family family agree for your love marriage 🤩😁♥️ Tag those friends who are really very excited for their wedding bus family maan jae''
अनेक जणांना या नवरीचं अशा पद्धतीने गाडी चालवणं असुरक्षित वाटत आहे. तिने हेल्मेट तर घातलेलं नाही. त्यामुळे निदान हाफ हेल्मेट तरी वापरायला पाहिजे होतं, असं तिला काही जण सुचवत आहेत. ''Complete unsafe riding highly irresponsible....'', ''lehnga fass gaya na agar pahiye mein , Sara swag road pe reh jaega...'' अशा पद्धतीच्या कमेंटही या व्हिडिओला आल्या आहेत.