Lokmat Sakhi >Social Viral > कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक

कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक

Kitchen Cleaning Tips : झटपट किचन साफ करायच्या काही सोप्या ट्रीक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 09:50 AM2022-11-16T09:50:55+5:302022-11-16T09:55:02+5:30

Kitchen Cleaning Tips : झटपट किचन साफ करायच्या काही सोप्या ट्रीक्स...

No matter how much you limit it, the kitchen gets messy, 5 tips - the kitchen will stay shiny forever | कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक

कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक

Highlightsबेकींग सोडा, व्हिनेगर किंवा साबणाचा फेस केल्यास सिंक, त्याठिकाणचा नळ आणि टाईल्स चांगल्या साफ होतात. हाताखाली एक वेगळं फडकं ठेवा. जेणेकरुन डब्यांना काही डाग पडले तर ते वेळच्या वेळी पुसता येतील.

घरातील सर्वात जास्त वापरली जाणारी खोली म्हणजे किचन. याचे कारण म्हणजे घरातील प्रत्येकाच्या खाण्याच्या वेळा, आवडीनिवडी जपत याठिकाणी सतत काही ना काही केलं जातं आणि ही खोली खराबही जास्त होते. रोजच्या धावपळीत आपण किचन आवरतो खरं पण काही दिवसांनी तिथे पुन्हा खूप पसारा झाल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळे याठिकाणी एकतर झुरळं होतात किंवा मुंग्या लागतात. अनेकदा डब्यांना कसले कसले हात लागल्याने डबे खराब होतात, तर कधी हातून काही सांडल्यामुळे ट्रॉलीमध्ये घाण होते. घाईच्या वेळी आपल्याकडे हे आवरण्यासाठी पुरेसा वेळ असतोच असे नाही. अशावेळी आपण तात्पुरते काहीतरी करतो आणि ऑफीसला निघून जातो. मात्र टाईल्सवर पडलेले डाग, डाग पडलेले शेल्फ, रोजच्या वापराने ओटा आणि सिंक खराब झालेले असते. हे सगळे साफ करायचे तर काही सोप्या युक्त्या माहिती असायला हव्यात. पाहूयात झटपट किचन साफ करायच्या काही सोप्या ट्रीक्स (Kitchen Cleaning Tips)...

(Image : Google)
(Image : Google)

१. टाईल्स साफ करताना

रोज आपण ओटा ड्राय क्लीन करत असू पण आठवड्यातून एकदा सुट्टीच्या वेळी ओटा आणि त्यामागच्या टाईल्स आवर्जून साफ करा. या टाईल्स साफ करण्यासाठी बेकींग सोडा, व्हिनेगर, स्टेन क्लिनर, हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा अगदी साबणाच्या पाण्याचाही चांगला उपयोग होतो. 

२. सामानाचे सॉर्टींग

अनेकदा घाईघाईत आपण एखादा सामानाचा पुडा फोडला की तो तसाच राहतो. मात्र आठवणीने या पुड्याला टाय क्लिप किंवा रबर लावून तो डब्यामध्ये घालून ठेवा. न लागणारे जास्तीचे सामान ठेवण्यासाठी एखादा मोठा डबा नाहीतर कोठी ठेवा म्हणजे ते सामान इकडे तिकडे लोळणार नाही. 

३. खाऊचा डबा 

लहान मुलं किंवा मोठेही काही खाऊ खायला घेतला की त्याचे पुडे तसेच ठेवतात. मात्र या खाऊसाठी किंवा बिस्कीटे, वेफर्स अशा कोरड्या खाऊसाठी एक खास वेगळा डबा ठेवा. म्हणजे खाऊच्या गोष्टी इकडेतिकडे होणार नाहीत. 

(Image : Google)
(Image : Google)

४. डबे आणि ट्रॉलीचे डाग

अनेकदा आपण स्वयंपाक करत असताना काही डब्यांना किंवा ट्रॉलीला हात लावतो. खरकटे हात इकडेतिकडे लागल्याने डबे आणि ट्रॉली खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी हाताखाली एक वेगळं फडकं ठेवा. जेणेकरुन डब्यांना काही डाग पडले तर ते वेळच्या वेळी पुसता येतील. तसेच ट्रॉली पुसण्यासाठीही एक फडके ठेवून ट्रॉलीवर काही सांडले तर ते साफ करण्यासाठी फडक्याचा उपयोग होईल. 

५. सिंक असं ठेवा साफ

गरम पाण्याने सिंक चांगले साफ होते. इतकेच नाही तर बेकींग सोडा, व्हिनेगर किंवा साबणाचा फेस केल्यास सिंक, त्याठिकाणचा नळ आणि टाईल्स चांगल्या साफ होतात. त्यामुळे याठिकाणी वास येणे, मुंग्या होणे असे प्रकार होत नाहीत. 
 

Web Title: No matter how much you limit it, the kitchen gets messy, 5 tips - the kitchen will stay shiny forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.