Lokmat Sakhi >Social Viral > मोबाइलशिवाय चैन पडत नाही, तासन्तास मोबाइल बघता? मोबाइल व्यसन सोडवण्यासाठी 5 उपाय

मोबाइलशिवाय चैन पडत नाही, तासन्तास मोबाइल बघता? मोबाइल व्यसन सोडवण्यासाठी 5 उपाय

मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी पाहूया काही महत्त्वाच्या टिप्स, मोबाइलचे व्यसन होईल कमी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:30 PM2022-04-11T17:30:08+5:302022-04-11T18:04:43+5:30

मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी पाहूया काही महत्त्वाच्या टिप्स, मोबाइलचे व्यसन होईल कमी....

No peace without mobile, looking at mobile for hours? 5 Remedies for Mobile Addiction | मोबाइलशिवाय चैन पडत नाही, तासन्तास मोबाइल बघता? मोबाइल व्यसन सोडवण्यासाठी 5 उपाय

मोबाइलशिवाय चैन पडत नाही, तासन्तास मोबाइल बघता? मोबाइल व्यसन सोडवण्यासाठी 5 उपाय

Highlightsतुमचा मोबाइलवर सर्वाधिक वेळ जात असेल अशी अॅप्लिकेशन मोबाइलमधून डिलीट करानोटीफिकेशन्स नसतील तर आपला फोनवरील वेळ कमी होण्याची शक्यता आहे. 

मोबाइल ही आपल्यापैकी अनेकांसाठी सध्या जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याप्रमाणे हातात २४ तास मोबाइल असण्याचे व्यसन आपल्यापैकी अनेकांना असते. इतकेच नाही तर काही वेळ आपला मोबाइल आसपास दिसला नाही तर आपण अस्वस्था होतो. अनेकदा आपल्याला मोबाइलचे किंवा सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे हे आपल्या लक्षात येते पण ते व्यसन घालवण्यासाठी नेमके काय करायचे ते आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपल्या मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे आपले आयु्ष्य काही प्रमाणात तरी तणावरहित होऊ शकते. तसेच मोबाइलचा कमी वापर केल्याने आपल्या उत्पादन क्षमतेवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. पाहूयात मोबाइल कमी वापरण्यासाठी काय करायला हवे याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. रात्री झोपताना मोबाइल दूर ठेवा 

हल्ली आपल्यातील बरेच जण रात्री झोपताना कित्येक तास मोबाइल पाहतात. कधी यामध्ये एखादी सिरीयल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर एखादी सिरीज पाहिली जाते. तर कधी सोशल मीडिया अकाऊंटसवर विनाकारण वेळ घालवला जातो. डोळ्यावर झोप आलेली असताना अनेकदा आपण मोबाइल पाहत राहतो आणि पुढे बराच वेळ मोबाइलमध्ये जातो. त्यामुळे आपल्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. 

२. रोजचा वापर ट्रॅक करा

रोज मोबाइलमधील वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून तुम्ही मोबाइल किती वापरता याचे ट्रॅकींग ठेवा. यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारच्या अॅप्लिकेशन्सचा सर्वाधिक वापर करता हे     तुमच्या लक्षात येईल आणि तो वापर कमी करण्यासाठी काय करायला हवे याबाबत तुमचे तुम्हाला प्रयत्न करता येतील. मात्र यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

३. पुश नोटीफिकेशन्स बंद ठेवा 

आपण सतत फोनशी कनेक्ट असायला हवे यासाठी त्यावर अनेक पर्याय असतात. पुश नोटीफिकेशन हा त्यातीलच एक. आपण जी वेगवगेळी अॅप्लिकेशन्स वापरतो त्यावरील नोटीफिकेशन्स आपल्याला सातत्याने मोबाइलवर येत असतात. ही नोटीफइकेशन्स आली की आपण फोन पाहण्यात गुंतून जातो आणि आपला बराच वेळ फोनवर जातो. मात्र ही नोटीफिकेशन्स नसतील तर आपला फोनवरील वेळ कमी होण्याची शक्यता आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

४. स्वत:चे एक रुटीन बनवा 

आपल्याला सतत मोबाइलवर काही आलंय का असं बघण्याची एक प्रकारची सवय लागलेली असते. त्यामुळे काही आले नसेल तरी आपण सतत मोबाइल पाहत राहतो. अशावेळी सुरुवातीला १५ ते २० मिनीटांनी त्यानंतर अर्धआ तासाने, मग पाऊण तासाने आणि मग १ तासाने मोबाइल पाहायचा असे ठरवा आणि ते फॉलो करा. यामुळे हळूहळू तुमचा फोन वापरण्याचा कालावधी नक्कीच कमी होऊ शकेल. 

५. गरज नसलेली अॅप्लिकेशन्स डिलीट करा 

ज्या अॅप्लिकेशनच्या वापरामुळे तुमचा मोबाइलवर सर्वाधिक वेळ जात असेल अशी अॅप्लिकेशन मोबाइलमधून डिलीट करा. त्यामुळे नकळतच तुमचा मोबाइलवर वेळ घालवण्याचा वेळ वाचेल आणि यामुळे तुमचे मोबाइलवरचे सततचे स्क्रोलींग कमी होईल. 

Web Title: No peace without mobile, looking at mobile for hours? 5 Remedies for Mobile Addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.