Lokmat Sakhi >Social Viral > न्यू इयर सेलिब्रेशनचा काहीच प्लॅन नाही? घरच्याघरी सेलिब्रेशनच्या ४ भन्नाट आयडिया, दणक्यात करा पार्टी ती ही कमी पैशात

न्यू इयर सेलिब्रेशनचा काहीच प्लॅन नाही? घरच्याघरी सेलिब्रेशनच्या ४ भन्नाट आयडिया, दणक्यात करा पार्टी ती ही कमी पैशात

New Celebration Idea at Home कोण म्हणतं बाहेर जाऊनच थर्टी फस्ट सेलिब्रेट करायला हवं. घरच्यांसोबत करा खास पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 04:54 PM2022-12-30T16:54:09+5:302022-12-30T17:05:37+5:30

New Celebration Idea at Home कोण म्हणतं बाहेर जाऊनच थर्टी फस्ट सेलिब्रेट करायला हवं. घरच्यांसोबत करा खास पार्टी

No plan for New Year celebration? 4 amazing ideas of celebration at home, throw a party with less money | न्यू इयर सेलिब्रेशनचा काहीच प्लॅन नाही? घरच्याघरी सेलिब्रेशनच्या ४ भन्नाट आयडिया, दणक्यात करा पार्टी ती ही कमी पैशात

न्यू इयर सेलिब्रेशनचा काहीच प्लॅन नाही? घरच्याघरी सेलिब्रेशनच्या ४ भन्नाट आयडिया, दणक्यात करा पार्टी ती ही कमी पैशात

नवीन वर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस उरलेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. कोणी फॅमिलीसह ट्रीपला धम्माल करत आहेत. तर कोणी पार्टी, कार्यक्रमांचे आयोजन करून थर्टी फस्ट एन्जॉय करणार आहेत. मात्र, काही लोकं घरच्या घरी आपली न्यू पार्टी सेलिब्रेट करणार आहेत. आपण देखील न्यू इयर पार्टी घरच्या घरी साजरी करू इच्छिता, तर काही आयडिया फॉलो करा. हे एक्टिविटीज आपल्याला न्यू इतर सेलिब्रेट करण्याची सकारात्मक वाईब देतील.

व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सहभागी व्हा

काही कारणास्तव आपण नवीन वर्षासाठी काही प्लॅन तयार करू शकला नसाल. तर, घरी बसून आपण डान्स परफॉर्मन्सच्या थेट प्रसारणात सहभाग घेऊ शकता. आजकाल यूट्यूबसह अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे लाइव्ह कार्यक्रम होतात. घरात बसूनही तुम्ही या कार्यक्रमांचा आनंद लुटू शकता.

मित्रांसोबत घरी चित्रपट पाहा

तुमच्या व्यतिरिक्त असे बरेच लोक असतील जे घरात राहून नवीन वर्ष साजरे करत असतील. आपण नवीन वर्षात आपल्या मित्रांसह चित्रपट पाहू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या घरी अथवा मित्रांच्या घरी मूव्ही पार्टीचे आयोजन करू शकता.

नवीन वर्षासाठी संकल्प आखा

नवीन वर्षाकडून लोकांना खूप अपेक्षा असते. यासोबतच येणाऱ्या वर्षामध्ये अनेक लोक काही ना काही नवीन संकल्पही ठरवतात.
आपण देखील नवीन वर्षात नवीन संकल्प ठरवू शकता. ज्याने तुम्हाला पुढील वाटचालीस मदत मिळेल.

लज्जतदार जेवण बनवा

अन्न ही एक अशी गोष्ट आहे ज्याने प्रत्येकाचे मुड हॅपी होतो. या नवीन वर्षात जेवण ऑर्डर करण्याऐवजी नवीन पदार्थ स्वतः बनवा. जर तुम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसेल तर तुम्ही युट्यूब व्हिडिओ पाहून नवीन रेसिपी ट्राय करू शकता. हे पदार्थ आपण आपल्या प्रियजनांना देखील खाऊ घालू शकता.

Web Title: No plan for New Year celebration? 4 amazing ideas of celebration at home, throw a party with less money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.