Join us  

गणपतीचं मखर सजवायला वेळच मिळाला नाही? ऐनवेळी झटपट सजावट करण्यासाठी ५ सोप्या टिप्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 2:53 PM

Ganpati Decoration In Just 10 Minutes: टेन्शन घेऊ नका. गणपतीसाठी अगदी झटपट छान सजावट करता येईल. त्यासाठीच बघा या काही साध्या- सोप्या आणि कमी वेळेत होणाऱ्या टिप्स..

ठळक मुद्दे या काही सोप्या टिप्स बघा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्याची मदत घेऊन गणपतीसाठी छान आरास करता येईल.

अगदी उद्यावर गणेशोत्सव (Ganeshotsav) आला आहे. पण तरी अनेक जणींना रोजच्याच कामांमधून वेळ मिळत नाहीये. त्यामुळे मग गणपतीसाठी मखर करायला, त्याची सजावट (decoration tips for ganpati) करायला वेळच नाही. तुमचीही अशीच अडचण असेल आणि आता ऐनवळी कसं काय सगळं करावं, याचं टेन्शन आलं असेल तर या काही सोप्या टिप्स बघा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्याची मदत घेऊन गणपतीसाठी छान आरास करता येईल. बघा या काही आयडिया तुम्हाला आवडतात का...(simple and quick ideas for ganpati decoration)

 

१. फुलांच्या माळा अनेक जणांकडे दिड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे ताज्या फुलांच्या माळा आणून तुम्ही डेकोरेशन करू शकता. दिवसभरातून एक- दोन वेळा फुलांवर पाणी शिंपडलं तर दिड दिवस फुलं चांगली टिकतात.

बाप्पाच्या स्थापनेसाठी एक दिवस आधीच करून ठेवा तयारी... ऐनवेळी गडबड- गोंधळ होणार नाही 

यासाठी निशिगंधाच्या माळा आणा अणि जिथे गणपती बसवायचा आहे, त्या भिंतीला सेलोटेपच्या मदतीने चिटकवून टाका. मस्त सुवासिक फुलांच्या माळांमध्ये गणराय विराजमान होतील. ज्यांच्याकडे १० दिवसांचा गणपती असतो, ते आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावू शकतात.

 

२. कागदी पुठ्ठा आणि फुलंगणपतीच्या मागे बॅकड्रॉप लावला तरी डेकोरेशन छान दिसतं. यासाठी सरळ एक मध्यम आकाराचा पुठ्ठा घ्या. त्यावर बाजारात मिळणारे सोनेरी, चंदेरी कागद चिटकवा. या कागदावर खरी किंवा आर्टिफिशियल फुलं लावून टाका. किंवा त्यावरून मोत्यांच्या माळा सोडा. झटपट सजून जाईल गणपती बसविण्याची जागा.

 

३. लाईटिंगअगदीच काही करायला वेळ मिळाला नाही, तर सरळ वेगवेगळे लाईट आणि लाईटिंगच्या माळा गणपतीच्या आजूबाजूला सोडा. प्रकाशमान असलेले गणपती बाप्पा छानच दिसतात.

 

४. कुंड्यांची सजावटशोभेच्या झाडाच्या कुंड्या घरात असतील, तर डेकोरेशनसाठी वेगळं काही करण्याची गरजच नाही. आकर्षक झाडांच्या कुंड्या उचला आणि सुबक पद्धतीने गोलाकार रचून ठेवा. किंवा दोन्ही बाजूंना २ कुंड्या ठेवा. कुंड्यांच्या मधोमध गणपती बाप्पाचं आसन ठेवा. त्या झाडांवर लाईटिंग सोडा. अवघ्या १०- १५ मिनिटांत झालं डेकोरेशन.

 

५. ओढणीघरात छान ओढण्या असतातच. एकमेकींशी रंगसंगती जुळणाऱ्या ओढण्या घ्या. सेलोटेप लावून त्यांची छान कमान करा किंवा वेगवेगळं डिझाईन करून त्या भिंतीला चिटकवून टाका.  

टॅग्स :सोशल व्हायरलगणेशोत्सवगणेशोत्सव