चमचा-लिंबू शर्यंत म्हटली की सगळ्यांनाच लहानपण आठवतं. या स्पर्धेत जिंकल्यासाठी काहीही करण्याची मुलींची तयारी असते. सोशल मीडियावरचमचा-लिंबू शर्यतीत भाग घेतलेल्या लहान मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Nothing sums up the idiom slow and steady wins the race more than this video it has 10 million views)
Slow and steady wins the race. —Aesop pic.twitter.com/6yaixiJvER
— Vala Afshar (@ValaAfshar) November 9, 2022
वाला अफसार नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही लिंबू शर्यतीत सहभागी झालेली लहान मुले पाहू शकता. त्यांच्यापैकी काही घाईघाईने सुरुवात करतात परंतु ते त्यांचे लिंबू मध्यभागी टाकतात.
४९ व्या वर्षीही पंचवीशीचा फिटनेस; समोर आलं सुपरफिट मलायकाचं फिटनेस सिक्रेट
एक पांढरा शर्ट घातलेला मुलगा शेवटच्या पॉईंटपर्यंत पोहोचत असताना तो सतत वेग राखत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तो इतरांसारखा वेगवान नसला तरी, त्याने नेहमी ध्येयाकडे लक्ष दिले आणि हळूहळू परंतु स्थिरपणे शेवटच्या रेषेपर्यंत मजल मारली.कमेंट्स विभागात या मुलाच्या हुशारीचं कौतुक केलं जात आाहे. या मुलाकडून खूप शिकण्यासारखं आहे अशी कमेंट एका युजरनं केली आहे. या व्हिडिओला जवळपास १ हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.