कितीही अत्तर वापरले सेंट वापरले तरी त्याचा वास एका गोष्टी पुढे फिकाच पडतो. ती गोष्ट म्हणजे फुले. सगळ्यात मस्त वास असतो तो म्हणजे फुलांचा. फुलांचे असंख्य प्रकार आहेत आणि प्रत्येक फुलाचा वास हा वेगळाच.(Now make the 'Chafa Bottle' at home, only 1 thing is needed - the fragrance of Chafa will last for years) रंगालाही रंगीबेरंगी अशी ही फुले दिसायलाही फार आकर्षक असतात. घरी आपण फ्लॉवरपॉट तयार करून ठेवतो. त्यामध्ये रोज वेगळी फुले लावतो. घरात छान फुलांचा वास पसरलेला असतो. गुलाबाचे चाहते भरपूर असले तरी आणखी एक फुल आहे ज्याचा वास मनाला वेगळाच आनंद देतो. (Now make the 'Chafa Bottle' at home, only 1 thing is needed - the fragrance of Chafa will last for years)ते फुल म्हणजे चाफा. चाफ्याचा पिवळा रंग दिसायला फार सुंदर दिसतो त्याचा वास तर अगदीच मनमोहक असतो.
कोकणामध्ये किंवा इतरही काही ठिकाणी गावांमध्ये सोनचाफ्याची बाटली विकत मिळते. त्यामध्ये पाण्यात चाफा ठेवलेला असतो. तो दिसायला तर मस्तच दिसतो. ती फुले १० ते १५ वर्षे खराब होत नाहीत. चाफा खरा सकाळी आणला तरी दुपारपर्यंत कोमेजून जातो. पण मग या बाटलीमध्ये ठेवलेला चाफा वर्षानुवर्षे कसा टिकतो? असा प्रश्न ती बाटली बघून पडतोच. त्यामध्ये काही रसायने टाकलेली असतील असे आपल्याला वाटते. मात्र तसे काही नसून आपल्या घरात असलेल्या एका पदार्थामुळे ती फुले अशी वर्षानुवर्षे ताजी दिसतात. ही शोभेची बाटली घरी तयार करणे अगदीच सोपे आहे. पाहा काय करायचे.
१. झाडावरून एकदम ताजी अशी फुले तोडून आणायची. जरा खराब झालेली किंवा काळपटलेली फुले बाजूला सारा. फक्त चांगलीच फुले वापरा. एक जरी खराब फुल वापरले तर इतरही फुले खराब होऊ शकतात.
२. एका पातेल्यामध्ये बाटलीभर पाणी घ्या. चांगले स्वच्छच पाणी वापरा. त्या पाण्यामध्ये तुरटी फिरवा. किमान दोन मिनिटे तरी फिरवा.
३. एक काचेची बाटली घ्या. ती एकदम स्वच्छ धुऊन घ्या. त्यामध्ये चाफ्याची फुले छान सेट करून घ्या. फुले सेट झाली की तुरटीचे पाणी त्यामध्ये ओता. बाटलीमध्ये हवा नाही राहणार या एकाच गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची. पाणी बाटलीमध्ये ओतल्यावर त्यामध्ये बुडबुडे येतील. ते जाईपर्यंत पाणी वर खाली करून घ्यायचे. बाटलीच्या अगदी टोकापर्यंत पाणी भरायचे.
४. फेवीक्विक सारखेच फेवीबॉण्ड बाजारात मिळते. त्याचा वापर करून झाकण एकदम घट्ट लावायचे. त्यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची.
अगदी ५ मिनिटांचे हे काम आहे. मात्र वर्षानुवर्षे टिकते. घरी नक्की तयार करून बघा.