Lokmat Sakhi >Social Viral > नॉनस्टिकचा तवा-कढई कोटिंग गेलं म्हणून फेकून द्यावी की वापरली तर चालते? नेमकं खरं काय..

नॉनस्टिकचा तवा-कढई कोटिंग गेलं म्हणून फेकून द्यावी की वापरली तर चालते? नेमकं खरं काय..

Nutritionist explains Teflon coating and how you can use it without fear for low oil cooking : नॉन स्टिकचं कोटिंग निघालं तर पदार्थ चांगले होत नाहीत, आरोग्यासाठी घातक ठरतात हे कितपत खरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 06:10 PM2024-03-28T18:10:11+5:302024-03-28T18:11:17+5:30

Nutritionist explains Teflon coating and how you can use it without fear for low oil cooking : नॉन स्टिकचं कोटिंग निघालं तर पदार्थ चांगले होत नाहीत, आरोग्यासाठी घातक ठरतात हे कितपत खरं?

Nutritionist explains Teflon coating and how you can use it without fear for low oil cooking | नॉनस्टिकचा तवा-कढई कोटिंग गेलं म्हणून फेकून द्यावी की वापरली तर चालते? नेमकं खरं काय..

नॉनस्टिकचा तवा-कढई कोटिंग गेलं म्हणून फेकून द्यावी की वापरली तर चालते? नेमकं खरं काय..

कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी बरेच जण नॉन स्टिक भांड्यांचा वापर करीत आहे. नॉन स्टिक तव्यामध्ये अन्न शिजवताना जळत नाही. शिवाय तेलाचा देखील वापर कमी होतो. मुख्य म्हणजे अन्न तव्यावर चिकटत नाही. ज्यामुळे घासण्यासाठी जास्त जोर द्यावा लागत नाही (Non Stick Tawa). नॉन स्टिक तव्यावर एक लेअर असते. भांडी घासून बऱ्याचदा पृष्ठभाग खराब होतो.

कोटिंग खराब झाल्यानंतरही आपण ती भांडी फेकून न देता, त्यातच स्वयंपाक करतो. पण त्यात तयार केलेलं अन्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? अन्न शिजवताना त्यात कोटिंगचे कण मिक्स होतात (Kitchen Tips). हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? यासंदर्भात, आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी कोटिंग खराब झालेला तवा वापरायचे की नाही याची माहिती दिली आहे(Nutritionist explains Teflon coating and how you can use it without fear for low oil cooking).

नॉन स्टिक भांड्यांचा वापर करावा का?

- नॉन स्टिक तव्याचा वापर बहुतांश घरात होतो. त्यावर अन्न कमी तेलात, व न चिकटता तयार होते. तव्यावर अन्न स्टिक होऊ नये म्हणून त्यावर एक विशेष कोटिंग असते. त्या कोटिंगला टेफ्लॉन असे म्हणतात.

- टेफ्लॉन कोटिंग कोणत्याही गोष्टीसोबत रिअॅक्ट होत नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही पदार्थ शिजवल्यास चिटकत नाही. किंवा लगेच रिअॅक्ट होत नाही. त्यामुळे त्याचा शरीराला कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यात तयार केलेलं अन्न आपण खाऊ शकता.

मूत्रपिंडाचे विकार टाळा, प्या एक आयुर्वेदिक काढा! किडनी डिटॉक्सचा सोपा घरगुती उपाय

- बऱ्याचदा घासून नॉन स्टिक भांड्याचा कोट खराब होतो. ज्यामुळे अन्न त्यावर चिकटते आणि कोटिंगचे कण पदार्थात मिसळतात. जे आपल्या अन्नातून पोटात जातात. पण या कणाचा शरीराला होणारा दुष्परिणाम फारसा नाही. आपण या तव्याचा वापर करू शकता.

- पण एक मात्र आहे, तव्याचे कोटिंग खराब झाल्यानंतर पदार्थ तयार करताना त्यावर हमखास चिकटणार किंवा बिघडणार. पण त्याचा आरोग्याला कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

- नॉन स्टिक तव्याचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी फॉलो करू शकता.

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

- जसे की, नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवताना कुकिंग स्प्रेचा वापर टाळा. शिवाय तवा जास्त गरम करू नका. उष्णतेमुळे त्याचे कोटिंग खराब होऊ शकते. योग्य चमच्यांचा वापर करा. यासह स्क्रबरने तवा कधीही घासू नका. 

Web Title: Nutritionist explains Teflon coating and how you can use it without fear for low oil cooking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.