वडील, बाबा, पप्पा, बाप, फादर आणि आजकालची जेनरेशन झेड मुलं बाबांना पॉप्स म्हणून हाक मारतात. बाबा आणि लेकराचं नातं हे अद्भुत असतं. मुख्य म्हणजे मुलीचं आणि बाबाचं बॉण्डिंग हे समंजसपणा, विश्वास आणि मायेच्या पायावर उभे असते. वडिलांचे आपल्या मुलीवर असलेले प्रेम अतुलनीय आहे. बाप आपल्या मुलीला नेहमी लहान समजतो. तिला या जगातील सर्व सुख मिळावे यासाठी धडपडत असतो.
असंच एका बाप आणि मुलीचं अद्भुत नातं सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यातून बापाचं प्रेम किती अनमोल आहे हे दिसून आले. आपल्या एअर होस्टेस मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी एका वडिलांनी एक-दोन नव्हे तर, चक्क ६ फ्लाईट्सच्या तिकिटांची बुकिंग केली (Social Viral). सध्या या वेड्या बापाची वेडी माया सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी वडिलांचं कौतुकही केलं आहे(Ohio Dad Booked 6 Flights Just to Join His Flight Attendant Daughter During Her Christmas Shifts).
वेड्या बापाची वेडी माया
हैल वॉघन असे त्या वेड्या बाबाचे नाव असून, त्यांनी आपल्या मुलीसाठी म्हणजेचं पियर्स वॉघनसाठी ६ फ्लाईट्सच्या तिकिटांची बुकिंग केली. पियर्स ही व्यवसायाने फ्लाईट अटेंडंट असून, तिला कामामुळे ख्रिसमसची सुट्टी मिळाली नाही. निराश झालेल्या मुलीचा चेहरा पाहून बापाने आपली सुट्टी मुलीसोबत घालवण्याचे ठरवले. त्यांनी कशाचाही विचार न करता थेट, पियर्स ज्या विमानात अटेंडंट म्हणून कार्यरत असेल, त्या त्या विमानाच्या तिकिटांची बुकिंग केली. त्यांनी एकूण ६ फ्लाईट्सच्या तिकिटांती बुकिंग केली असून, यामुळे मुलीचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठतेवर घरगुती ५ उपाय, पोट होईल साफ-सकाळी एकदम ओके
यासंदर्भात, फ्लाईटमध्ये असलेल्या एका प्रवाश्याने फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने हैल वॉघनचे पियर्सबद्दल असलेली काळजी आणि प्रेम शेअर केलं आहे. माईक लेवी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'माझ्या शेजारी फ्लाईट अटेंडंट पियर्सचे वडील हैल वॉघन बसले होते. पियर्सला कामामुळे ख्रिसमसची सुट्टी मिळाली नाही. आपल्या मुलीला दुःखी पाहून, हैल वॉघन यांनी १, २ नसून ६ फ्लाईट्सच्या तिकिटांची बुकिंग केली. या कारणामुळे ते अधिक वेळ आपल्या मुलीसोबत घालवू शकतील. आपल्या मुलीचा ख्रिसमस खास बनवण्यासाठी वडिलांनी ही शक्कल लढवली.' या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद
दुखापतीवरून उठूनही मुलीसाठी केला प्रवास..
हैल वॉघन हे काही दिवसांपूर्वी पाठदुखी आणि मानेच्या दुखापतीमुळे त्रस्त होते. त्यांचे शरीर काही काळ अर्धांगवायू झाले होते. त्या वेदनेतून सावरल्यानंतर हैल यांची ही पहिलीच हवाई यात्रा होती. आपल्या दुखण्याला विसरून, हैल यांनी मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी धडपड केली आहे. उगाच मुलीला बापाचं काळीज म्हणत नाही..