Join us  

हदयस्पर्शी! पावसात रस्ता ओलांडणाऱ्या आजी आजोबांची एकमेकांना साथ! एक खास लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 4:00 PM

Old couple crossing the road together : पावसात रस्ता ओलांडत असलेल्या आजी आजोबांचा फोटो पाहून नेटिझन्स यांच्यातील प्रेमाचे कौतुक करत आहेत.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे तुम्ही ऐकून असाल. सध्या सोशल मीडियावर वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांना भरून आलं आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आयुष्यभर राहावं, सुखं, दुखं शेअर करावीत आणि मरेपर्यंत प्रेमाची साथ अशीच राहावी असं प्रत्येकाला वाटतं. पावसात रस्ता ओलांडत असलेल्या आजी आजोबांचा फोटो पाहून नेटिझन्स यांच्यातील प्रेमाचे कौतुक करत आहेत. (Old couple crossing the road together)

पावसाळ्यात एकत्र फिरतानाचा एका वृद्ध जोडप्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे. छायाचित्रकार आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आसिफ खान यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.  या व्हिडिओला आतापर्यंत 26 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. (Old couple crossing the road together in rain will make you believe in eternal love watch viral video)

दुसऱ्या महिलेसाठी पतीनं पत्नीला सोडलं; त्यानंतर 'तिची' झलक पाहून पश्चाताप झाला

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे पावसाळ्याच्या दिवसात एकत्र रस्ता ओलांडताना दिसत आहे. आजोबा आपल्या पत्नीसाठी छत्री धरून  चालत असताना आजी त्याच्यासोबत बॅग घेऊन जात असल्याचे दिसून येते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "ज्या जगात काहीही टिकत नाही अशा जगात चिरंतन प्रेमाची कल्पना येणे मंत्रमुग्ध करणारे नाही का..." हा हृदयस्पर्शी  व्हिडिओ सर्वांनाच आवडला आहे. टिप्पणी विभागात प्रेमाचे इमोजीसह शेअर करत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया