लता दिदींचा आवाज हा तर केवळ एक स्वर्गीय अनुभव.. दैवी देणगी म्हणून त्यांच्या आवाजाकडे पाहिलं गेलं आणि इथून पुढच्या पिढ्याही पाहतील. दिदींचा गोड आवाज कानांवर पडताच मूड हमखास बदलून जातो. सुरांवरची, आवाजावरची त्यांची हुकूमत तर अबाधितच आहे, पण तरीही जेव्हा इतर गायिकांच्या गळ्यातून असाच एखादा स्वर घुमून येतो, तेव्हा दिदींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अशीच दिदींच्या सुरांची आठवण करून देणाऱ्या या एक अतिशय साध्यासुध्या आजीबाई (Old lady sings Lata Mangeshkar's song) सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत. (Video viral)
salman_sayyed_7715 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आजीबाई साधारण वयाच्या सत्तरीच्या आसपासच्या असाव्यात.
डोसा तव्यावर चिकटतो आणि सगळाच पचका होतो? ५ टिप्स, डोसा होईल हॉटेलसारखा कुरकुरीत
त्यांचं दिसणं, त्यांचं राहणीमान एवढं साधं आहे की त्यांच्याकडे पाहून यांनाही लता दिदींप्रमाणेच सुरेल आवाजाची देणगी मिळाली असेल, असं कुणालाही मुळीच वाटणार नाही. पण आलाप घेण्यासाठी जेव्हा आजी सुर लावतात, तेव्हा ऐकणारा खरोखरच त्यांचा आवाज ऐकून भारावून जातो आणि आणखी कान देऊन ऐकू लागतो. पाचगणीच्या पारसी पॉईंटवर या आजींची आणि आमची भेट झाली, असं हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
काही दिवसांपुर्वी शेअर झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यांचा सुरेल आवाज ऐकून नेटिझन्स खुशही झाले आहेत आणि त्यांच्या आवाजाची खरोखरच कदर करा,
जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
असे आवाहनही एकमेकांना करत आहेत. पण त्याचबरोबर ज्याने हा व्हिडिओ केला आहे, त्याच्यावर जाम नाराजही झाले आहेत. कारण त्यांना आजींचं गाणं आणखी ऐकायचं होतं पण व्हिडिओ घेणाऱ्याने मात्र एक ओळ ऐकून लगेच त्यांना थांबवलं.