Join us  

आजींनी केला जबरदस्त भांगडा, एनर्जी पाहा - जोश हो तो.. पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 5:28 PM

Old Women Dance Steps Viral Video : या महिलेचा जोश पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्दे१३ लाखांहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. असंख्य जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेतजगण्याची उमेद असेल तर वय हा केवळ आकडा असतो हेच यातून दिसून येते

डान्स म्हणजे अनेकांसाठी नशेसारखा असतो. गाण्याचे बोल सुरू झाले की अशा लोकांच्या अंगात असं काही संचारतं की ते स्वत:ला नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. सोशल मीडियावर कायम अशाप्रकारचे काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक वयस्कर महिला एका पार्टीमध्ये मनसोक्त नाचताना दिसत आहे. या महिलेचा जोश पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे या वयात तिच्यातील एनर्जी कमालीची असल्याचे दिसते. त्यामुळे वय हा केवळ आकडा आहे असे या पोस्टला कॅप्शन देतानाही म्हटले आहे (Old Women Dance Steps Viral Video). 

या महिलेचे नाव रेखा बजाज असून तिने लग्नाच्या एका पार्टीत हा डान्स केल्याचे दिसते. त्यांचे नेमके वय समजले नसले तरी त्यांचे सगळे केस पांढरे असल्याने ते नक्कीच जास्त असावे असा अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. साडी नेसून त्या अशा काही स्टेप्स करतात की उपस्थित असलेले सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. शैल शर्मा नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला असून शैल हा डीजे आणि बँड आर्टीस्ट असल्याचे समजते. ही महिला पंजाबी गाण्यावर अतिशय मनसोक्त नाचताना दिसत आहे. 

त्यांच्या डान्स स्टेप्स आणि एनर्जी पाहून मी आणि माझ्या बँडमधील बाकीचे लोक काहीसे थक्क झालो असे शैल याने पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे. जीवनात काहीही घडले तरी तुम्ही मात्र आपले आयुष्य मनसोक्त जगायला हवे असेही शैल याने पुढे म्हटले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करुन केवळ १ आठवडा झाला असून लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. इतकेच नाही तर १३ लाखांहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. असंख्य जणांनी या महिलेच्या एनर्जीला सलाम करत या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य