Join us

काय डेअरिंगबाज माणूस; सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचाच व्हाट्स अँप ग्रुप बनवून म्हणाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 18:21 IST

असं कुणी करतं का.. काय कमाल केली बाबा या माणसाने... चक्क सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचा (ex girl friends) ग्रुप बनवला आणि त्यांना म्हणाला.......

ठळक मुद्देटॉम आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्स यांचे संभाषण सोशल मिडियावरच चांगलेच व्हायरल झाले

आनंदाच्या भरात किंवा रागाच्या भरात कोण काय करेल काही सांगता येत नाही.. आता हेच बघा ना.. ख्रिसमसचा (Merry Christmas) सण जवळ ेयेत आहे. त्यामुळे टॉम नामक एका व्यक्तीला इतका आनंद झाला की त्याने आनंदाच्या भरात वॉट्सॲप ग्रुप बनवला.. व्हॉट्सग्रुप बनवणं यात काही नविन नाही, पण या पठ्ठ्याने चक्क कोणताही विचार न करता या ग्रुपमध्ये त्याच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सला ॲड केलं.. आता काय म्हणावं त्याच्या या हिंमतीला...

 

बेला, लिसा, स्टेफनी आणि जेमा अशा चार एक्स गर्लफ्रेंड त्याच्या या ग्रुपमध्ये होत्या. करंट गर्लफ्रेंडसमोर जर एक एक्स आली किंवा तिने जर चुकून एक्सचे चॅट वाचले तर इथे गडबड होऊन जाते.. अशा वेळी जर चार एक्स गर्लफ्रेंड एकत्र आल्या तर काय खळबळ उडेल याचा नुसता विचार करूनच हसू येते... टॉम आणि त्याच्या या ४ गर्लफ्रेंड्स यांच्या वॉट्सॲप ग्रुप (whatsapp group) चॅटचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मिडियावर (social media) चांगलेच व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी एक्स गर्लफ्रेंडचा ग्रुप बनविणाऱ्या या बहाद्दराच्या हिंमतीचे कौतूक केले आहे.

 

टॉमने ग्रुप बनविला आणि पहिलाच मेसेज टाकून आपल्या सगळ्या एक्सला नाताळाच्या शुभेच्छास्ट दिल्या. त्यानंतर तो असंही म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी या ग्रुपच्या माध्यमातून बोलावं आणि माझ्या काही आठवणी एकमेकींशी शेअर कराव्यात. मी या वर्षी एकटा असून तुम्हाला सगळ्यांना नाताळाच्या शुभेच्छा असं म्हणायलाही त्यानं कमी केलं नाही.. त्याचं हे ग्रुप बनवणं लिसाला अजिबात आवडलं नाही आणि तिने लगेच ग्रुप लेफ्ट केला.

 

टॉमने हे जे काही केलं ते जेमाला अजिबात आवडलं नाही. ती म्हणाली की तु नक्कीच ड्रंक असणार आणि त्यामुळेच नशेच्या भरात तु हे सगळं काही केलं असणार. बेला टॉमवर चांगलीच भडकली होती.. दुसऱ्या एका मुलीसाठी टॉमने आपल्याला फसवलं ही बाब तिला भयंकरच बोचली होती. त्यामुळेच ती खूप संतापली होती.. नंतरच्या काही संभाषणात तर बेला आणि स्टेफनी यांच्यातही वाद झालेला दिसून आला.. एकूणच काय तर टॉम आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्स यांचे संभाषण सोशल मिडियावरच चांगलेच व्हायरल झाले ..

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हॉट्सअ‍ॅपनाताळ