सोशल मीडियावर (Social Media) एक मजेदार आणि कठीण कोडे व्हायरल होत आहेत. हे ऑप्टिकल इल्युजन लोकांना डोकं खाजवायला भाग पाडतंय. अनेक सोशल मीडिया यूजर्स या फोटोच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण काही लोकांकडेच इतका धारदार मेंदू असतो की ते हा ऑप्टिकल इल्युजन पाहून गोंधळून जात नाहीत आणि लगेच योग्य उत्तर शोधतात. (Optical illusion only genius brain can spot young girl and old lady in trending photo viral puzzle iq test)
हा फोटो (Viral Photo)) पाहून तुम्हाला दोन चेहरे शोधावे लागतील. एकाच फोटोत एक तरुण मुलगी आणि वृद्ध महिलेचा चेहरा लपलेला आहे. पण हे काम तुम्हाला फक्त 20 सेकंदात करायचे आहे, हे चॅलेंज आहे. तुम्ही फोटो पाहण्यास सुरुवात करताच, 20 सेकंदांचा टायमर सेट करा आणि दोन चेहरे शोधणे सुरू करा.
काही लोक या फोटोमध्ये मुलगी लगेच पाहू शकतात. पण म्हातारी बाई शोधायला डोळ्यांना वेळ लागू शकतो. फोटो नीट बघत राहिलात तर हे कोडे सोडवता येईल. वरील फोटो पाहून समजून घ्या, तुम्हाला या दोघांचा फोटो कसा पाहावा लागला... या फोटोकडे दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास तुम्ही मुलगी आणि वृद्ध महिलेला एकत्र दिसेल. ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी अनेकांनी त्यांचे डोकं चालवले, परंतु त्यापैकी काही यशस्वी झाले.