सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही ट्रेंडिंग असतं. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजन्स Optical Illusion प्रकारात मोडणारा फोटो सोशल मिडियावर गाजतो आहे. प्राणी माणसांसारखा व्यवहार करतात, गाड्या वगैरे चालवतात, डोनट खातात, असं आपण आजवर फक्त लहान मुलांच्या ॲनिमेटेड कार्यक्रमांमध्ये बघत आलो आहोत किंवा मग पुस्तकातून त्याच्या गोष्टी वाचत आलो आहोत. पण हे सगळं खरं आहे की काय, असं क्षणभर वाटणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे बघा हा फोटो आणि लावा डोकं (brain test)... आणि सांगा तुमच्या लक्षात येतंय का की हा फोटो नेमका कशाचा आहे? नेमकं काय दिसतंय या फाेटोमध्ये..
ऑप्टिकल इल्यूजन्स प्रकारातल्या इमेजेस साधारण अशा असतात की त्यांच्यातला ट्विस्ट आपल्याला वरवर बघता लक्षात येत नाही. त्यामुळे ब्रेन टेस्ट म्हणूनही या इमेजेस ओळखल्या जातात. जेव्हा आपण अगदी बारकाईने निरिक्षण करतो, तेव्हाच आपल्याला त्यातली खरी गंमत कळून येते. या फोटोमध्येही नेमकं असंच काहीसं दिसतं आहे. तुम्ही जर हा फोटो पाहिला तर घोडा गाडी चालवतो आहे की एखादी तरुणी हे चटकन लक्षातच येत नाही. नेमका कशा पद्धतीने हा फोटो काढला गेला आहे, हेदेखील लक्षात येत नाही.
जुन्या स्लिपरला द्या नवा स्टायलिश लूक! जुन्यातून बनवा नव्या फॅशनेबल चपला, टाकाऊतून टिकाऊ!
ही आहे त्या फोटोतली खरी गंमत
एक तरुणी घोडेस्वारी करते आहे. घोडेस्वारी करत एका हाताने डोनट खात आहे. त्याचवेळी तिच्या पलिकडून अगदी तिच्या बरोबरीने एक दुसरा घोडा चालला आहे. फोटो काढण्याच्या वेळी मुलीने चेहरा नेमका घोड्याकडे वळवला. किंवा मग तिचे केस जरा जास्त पुढे आले आणि तिचा चेहरा झाकला गेला. त्यामुळे त्या फोटोत मुलीचे फक्त केस आणि हेल्मेट दिसते आहे तर चेहरा मात्र घोड्याचा दिसतो आहे. त्यामुळे घोड्याने हेल्मेट घातलं आहे आणि तो गाडी चालवत डोनट खातो आहे की काय, असा समज बघणाऱ्याला होत आहे.