वजन जास्त असणे हे केवळ आपल्या शरीरासाठीच घातक असते असे नाही तर त्याचा आपल्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही बराच परीणाम होत असतो. लठ्ठपणामुळे दैनंदिन जीवनात या लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. वजन जास्त असल्याने लठ्ठ लोकांना इतरांकडून अनेकदा वेगळी वागणूक मिळते. तसेच वजनामुळे काही वेळा आत्मविश्वासही कमी होण्याचीही शक्यता असते. जाडी जास्त असेल तर इतरांप्रमाणे आपल्याला झटपट कामे करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण विनाकारण लो फिल करतो. मग हे वाढणारे वजन कमी करण्यासाठी लठ्ठ लोक डाएट, जीमचा वर्कआऊट असे काही ना काही उपाय करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही (Overweight Man Loses 70 kgs After Girlfriend Calls Him Fat).
मात्र काही जण अतिशय जिद्दीने वजन कमी करायचे ठरवतात आणि ते करुनही दाखवतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या वजनाच्या निम्मे वजन कमी करुन कमाल करुन दाखवली आहे. लठ्ठपणामुळे त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेल्याने तो काहीसा दुखावला मात्र या दु:खात रडत न बसता त्याने ही गोष्ट प्रेरणा म्हणून घेतली आणि आपले प्रमाणाबाहेर वाढलेले वजन कमी करण्याचा चंग बांधला. या पठ्ठ्याने १-२ किलो नाही तर तब्बल ७० किलो वजन घटवले. आता हे करणे नेमके कसे शक्य झाले आणि काय आहे या तरुणाची लव्हस्टोरी पाहूया...
गर्लफ्रेंड म्हणाली...
डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाचे नाव पुवी असून त्याचे वजन १३९ किलो होते. आता त्याने आपले वजन कमी केले असून ते ६९ किलोपर्यंत घटवले आहे. आपल्या या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल पुवी याने टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. लठ्ठ असल्याने आपण कायम जॅकेट घालायचो असे पुवी सांगतो. इतकेच नाही तर आपल्या वाढलेल्या वजनामुळे गर्लफ्रेंडने पण आपल्याला सोडून दिले असे तो म्हणाला. प्रेमभंग झाल्यामुळे त्याने वजन कमी करण्याचा चंग बांधला आणि तो पूर्णही करुन दाखवला.
वजन कमी करण्यासाठी त्याने नेमके काय केले?
सगळ्यात आधी त्याने जीम जॉईन केली. आता तो इतका फिट आहे की XXXL साईजच्या ऐवजी तो L साईजचे कपडे वापरतो. त्याने अनावश्यक चरबी तर व्यायामाने घटवलीच पण स्नायूंची ताकद वाढविण्यासाठीही त्याने भरपूर कष्ट घेतले. आता तो इतका वेगळा दिसतो की त्याच्या ओळखीचे लोकही त्याला ओळखू शकत नाहीत. व्यायामाबरोबरच त्याने आपल्या डाएटवरही लक्ष दिले. हाय प्रोटीन डाएट घेण्यावर त्याने भर दिल्याने त्याला स्वत:मध्ये इतका मोठा बदल करणे शक्य झाले.